11 वर्षाच्या मुलाचा देवी बरोबर लग्न लावण्याचा सल्ला देणारा गुरु ऐनवेळी पलटला; गैरप्रकार टळाला अश्विनी जाधव
मुंबई/पुणे

11 वर्षाच्या मुलाचा देवी बरोबर लग्न लावण्याचा सल्ला देणारा गुरु ऐनवेळी पलटला; गैरप्रकार टळाला

एखाद्या महिलेला मुल होत नाही तेव्हा ते देवीला नवस बोलतात मुल होईल ते तुला अर्पण करीन. अशा मुला मुलीचा विवाह देवी बरोबर लावुन त्यांना देवीला सोडले जाते.

अश्विनी जाधव केदारे साम टीव्ही पुणे

बारामती : एका व्हॉट्सअप ग्रुप (WhatsApp Group) वर नंदिनी जाधव यांना पोतराजच्या 11 वर्षाच्या मुलांचा गेनमाळ बांधण्याचा कार्यक्रम 28 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती मिळाली, या कार्यक्रमाची पत्रिका पाहण्यात आली. देवदासी विषयी काम करत असल्यामूळे गेनमाळ म्हणजे देवीबरोबर लग्न लावणे हे माहीत असल्यामुळे तसेच एखाद्या महिलेला मुल होत नाही तेव्हा ते देवीला नवस बोलतात मुल होईल ते तुला अर्पण करीन. अशा मुला मुलीचा विवाह देवी बरोबर लावुन त्यांना देवीला सोडले जाते.

हे देखील पहा -

असं थांबवल लग्न -

एका छोट्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न होता. या मुलाचा हळदीचा कार्यक्रम झाला होता. त्या फोटो मिळण्याचा प्रयत्न करून हळदी लावतानाचे फोटो मिळवले. प्रथापरंपराच्या अंधश्रद्धेच्या भीतीपोटी अल्पवयीन मुला मुली अवैज्ञानिक (Unscientific) विधी करण्यास भाग पाडत आहेत. यामध्ये अनेक बालकांचे शोषण होत आहे हे थांबवण्यासाठी कायद्या बरोबर या अशिक्षित लोकांचे प्रबोधन करण्याची गरज .ज्या गुरूनी हा विधी करावयास सांगितले होते त्यांच्याशी फोनवर संपर्क केला. फोन स्पिकरवर ठेवुन सर्वासमक्ष संवाद साधला त्यांना या होणार्‍या छोट्या मुलांचा गेनमाळ करण्याचा सल्ला आपण दिलात. तेव्हा त्यांनी मी या प्रथेच्या विरोधात आहे. हे चुकीचे आहे. या कार्यक्रमाला मी काही कोणाचा गुरू नाही. असे जेव्हा सांगितले तेव्हा नवनाथच्या कुटुंबांना धक्काच बसला. आपला गुरूच जर हे सर्व नाकारत असेल. तर मग मी तर कशाला हा विधी करू तेव्हा त्यांनी आम्हांला असे आश्वासन दिले,"मुलांचे शिक्षण करीन तसेच त्यांचे देवी बरोबर लग्न लावणार नाही" असे आश्वासन दिले. त्यांचे केस मी देवापुढे नैवेद्य दाखवुन काढुन टाकेन. आम्ही सर्वानी यास संमती दिली कारण आम्ही अंधश्रध्देला विरोध करतो श्रध्देला नाही. अडचणीच्या प्रसंगी गुरूनीच पाठ फिरवली होती. याची प्रत्यक्ष जाणीव  झाल्यामुळे मुलाच्या वडिलांनी कोणताच विधी न करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी प्रबोधनाची गरज -

दरम्यान या विधीसाठी चारशे लोकांना जेवणासाठी आमंत्रण देण्यात आले होते. त्यासाठी होणार्‍या खर्चासाठी कर्ज काढले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना कित्येक वर्षे कर्ज फेडत बसावे लागले असते. याची जाणीव करून दिली. तेच पैसे मुलांच्या शिक्षणासाठी वापरले तर त्यांचा फायदा होईल. नाहीतर आयुष्यभर डोक्यावर कर्जाचा डोंगर घेवुन जगावे लागेल. साधारण दोन ते तीन तासाच्या चर्चेनंतर त्यांच्या मनाची तयारी झाल्यानंतर रीतसर पोलीसांनी जबाब लिहुन घेतले. त्यांच्याही मनातील सर्व शंका कुशंका दुर करण्यास महा. अंनिसचे कार्यकर्ते (Activists of Anis) यशस्वी झाले होते. शिवाय एका छोट्या मुलाची या अनिष्ठ,अघोरी प्रथेतुन मुक्तता. झाली प्रथा परंपरांच्या, अंधश्रध्देच्या भितीपोटी अल्पवयीन मुलामुलीस अवैज्ञानिक विधी करण्यास भाग पाडत आहेत. यामध्ये अनेक बालकांचे शोषण होत आहे. हे थांबवण्यासाठी कायद्याबरोबर या अशिक्षित लोकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT