SSC HSC Exam 2022: दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार; राज्य शिक्षण मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय Saam Tv
मुंबई/पुणे

SSC HSC Exam 2022: दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार; राज्य शिक्षण मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : दहावी (SSC Board) आणि बारावीच्या (HSC Board) परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. राज्य शिक्षण मंत्रिमंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून १० वी, १२ वीच्या परीक्षा ऑनलाईन (Online) की ऑफलाईन होणार यावर संभ्रम कायम होता. मात्र, आता हा संभ्रम हा दूर झाला आहे. परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. महाराष्ट्र (Maharashtra) राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत या विषयी माहिती दिली आहे.

हे देखील पहा-

१२ वीची लेखी परिक्षा ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान ऑफलाईन होणार आहे. प्रॅक्टिकल (Practical) आणि तोंडी परिक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत दरम्यान घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे (corona) जे विद्यार्थी (Student) तोंडी किंवा लेखी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या दरम्यान परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे. यावर्षी १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा (Exam) देण्याकरिता वाढीव वेळ मिळणार आहे. ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेकरिता १५ मिनिटे अतिरिक्त वेळ तर ७० गुणांपेक्षा जास्त असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्याकरिता अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे.

परीक्षा देण्याकरिता परिक्षा हॉलमधे जास्तीत- जास्त २५ विद्यार्थी एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येणार आहेत. यावेळेस प्रॅक्टिकल परीक्षेकरिता शाळेबाहेर शिक्षक बहिस्थ परीक्षक म्हणून नसणार आहेत तर, त्यावेळेस शाळेतील शिक्षक अंत्यस्थ आणि बहिस्थ परीक्षक म्हणून काम करणार आहेत. मुख्य परिक्षेकरिता परीक्षक त्याच महाविद्यालयात असणार आहेत की बाहेरचे याविषयी अद्याप निर्णय होणे बाकी आहे.

परीक्षेच्या दरम्यान एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला तर, त्या विद्यार्थ्याला पुरवणी परिक्षेत परत एकदा त्या विषयाचा पेपर देता येणार आहे. जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते. तोंडी परीक्षा २ वेळेस देण्याची संधी देण्यात आल्याने निकालाच्या कालावधीवर कोणताही परिणाम होणार नाही. परिक्षेनंतर ४० ते ४५ दिवसांमधे निकाल लावण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

Maharashtra Live News Update: चाळीसगाव शहरात वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची बदली

Satara Tourism : बोटीतून पाहा सह्याद्रीचे सुंदर नजारे, साताऱ्यात आहे 'हे' खास लोकेशन

SCROLL FOR NEXT