Thane Water Problem Saam Digital
मुंबई/पुणे

Thane Water Cut: ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा! कधी आणि कोणत्या भागात पाणीपुरवठा राहणार बंद? वाचा डिटेल्स

Thane News : ठाणेकरांसाठी पाणीपुरवठ्याबाबत महत्वांच वृत्त समोर आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Thane News

ठाणेकरांसाठी पाणीपुरवठ्याबाबत महत्वांच वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे ठाणेकर नागरिकांनी पाणी जपून वापरा असेत म्हणावे लागणार आहे. तसेच पाणीकपातीपूर्वी नागरिकांनी आपल्याला लागणारा पाण्याचा आवश्यक असा साठा करून ठेवावा, असेही आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कापेरी, हाजुरी, गावदेवी , पाचपाखाडी, टेकडी बंगला ,किसननगर १ आणि२ तसंच भटवाडी या प्रभागात झोनिंगव्दारे १० टक्के पाणीकपात लागू होणार आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाणी कपातीचे कारण काय...?

ठाणे महानगरपालिकेस प्रसिद्ध अशा भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून प्रतिदिन २५० दक्ष लक्ष लिटर प्रतिदिन एवढ्या टक्क्यात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईत महानगरपालिकेमार्फत पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम चालू तारखेच्या २० नोव्हेंबर ते येत्या महिन्याच्या २ डिसेंबर २०२३ या कालावधीत करण्यात येणार आहे.

परिणामी,महानगरपालिकेच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी होण्यार आहे. ज्यामुळे ठाणे पालिकेस मुंबई महापालिकेमार्फत १० टक्के पाणीकपात लागू होणार आहे. ठाणे शहराला दर पंधरा दिवसांतून झोनिंगव्दारे होणाऱ्या पाणीकपातीची वेळ वाढवून १२ तासांऐवजी २४ तास करण्यात येत आहे.

१५ दिवसांतील बंद पाणीपुरवठा

सोमवार -ब्रह्मांड, बाळकुम

मंगळवार -घोडबंदर रोड

बुधवार- गांधीनगर

गुरुवार- उन्नती, सरकारपाडा, सिद्धांचल

शुक्रवार- मुंब्रा (रेतीबंदर)

शनिवार -समतानगर

रविवार- दोस्ती आकृती

सोमवार -जेल

मंगळवार- जॉन्सन, अनंतकाळ

बुधवार -साकेत, रुस्तमजी

गुरुवार -सिद्धेश्‍वर

शुक्रवार-कळवा, खारेगाव, आतकोणेश्वर नगर ४

शनिवार -इंदिरानगर

रविवार- ऋतू पार्क

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT