Wedding Entry  प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

जरा हटके ! नवरीची बैलगाडीतून धमाकेदार एन्ट्री; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात है’

ग्रॅण्ड एन्ट्री करण्याची पद्धत सध्या पडली

प्रदीप भणगे

ठाणे : सध्या लग्न सराई सुरु झाली आहे. लग्न म्हटले की दिमाखात आणि ग्रॅण्ड एन्ट्री करण्याची पद्धत सध्या पडली आहे. आपले लग्न (marriage) आणि त्यातली नवरा-नवरीची एन्ट्री (Bride Entry Video) लक्षात राहावी याकरिता लाखोंचा खर्च केला जात आहे. पण काही लोक आज देखील आपला साधेपण जपून आहे. त्याकरिता ते आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सामग्रीमधून काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घालत आहे.

पाहा व्हिडिओ-

यामध्ये नवरीने चक्क बैलगाडीतून (bullock cart) लग्नमंडपात एन्ट्री केली आहे. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा (Viral Video) आहे. ठाणे (Thane) जिल्ह्यातील दिव्यामधल्या दातिवली गावात (village) सुनील पाटील यांच्या कन्येचा विवाहसोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये नवरी हेमांगीने चक्क बैलगाडा शर्यतीतल्या बैलगाड्यात बसून लग्नात एन्ट्री केली आहे. यावेळी वऱ्हाडी मंडळींनी तिचं जोरदार स्वागत केले आहे.

हे देखील पाहा-

बैलगाडा शर्यतीवर बंदी उठल्यानंतर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यती होऊ लागल्या आहेत. यामुळे या खेळाची आधीपासून असलेली लोकप्रियता आता आणखी वाढली आहे. त्यात ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींसाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना पोटच्या मुलापेक्षा जास्त जपले जात असते. यामुळे दातिवली गावात नवरीची ही एन्ट्री सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. यामुळे लग्नातले विविध व्हिडिओ सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत. यामध्ये काही व्हिडिओ जरा हटके असतात. अशीच हटके एन्ट्री या नवरीने केली, तिची ही अस्सल गावरान एन्ट्री अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. त्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आघाडीवर

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

SCROLL FOR NEXT