Meena Kambli Join Shiv Sena Saam Tv
मुंबई/पुणे

Thane News: ठाण्यात ठाकरेंना आणखी एक धक्का! उपनेत्या कांबळी यांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Meena Kambli Join Shiv Sena: ठाण्यात ठाकरेंना आणखी एक धक्का! उपनेत्या कांबळी यांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Satish Kengar

Meena Kambli Join Shiv Sena:

ठाण्यात उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. थकले गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशदरम्यान त्या म्हणल्या आहे की, ''आज मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे. गेली 45 वर्ष मी शिवसेनेसाठी काम करत होते, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलं.''

मीना कांबळी म्हणाल्या, ''बाळासाहेब ठाकरे यांनी मला शिवसेना उपनेतेपद दिलं. पण माझ्या निष्ठेला आता न्याय मिळतं नव्हता. शिवसेना मजबूत करण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, मीना कांबळी यांचे मी स्वागत करतो. गेल्या वर्षभरापासून आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. आम्ही निर्णय घेतले, ते शिवसेना वाचवण्यासाठी आणि शिवसेना पुढे नेण्यासाठी. ते बाळासाहेबांचे विचारसोडून काँगेससोबत गेले. काल समाजवादीसोबत युती केली. महाविकास आघाडीच्या काळात बरेच प्रकल्प बंद केले. ज्यावेळी आम्ही सत्तेत आलो तेव्हा सगळे पुन्हा सुरू केले.

शिंदे म्हणाले, ''राज्य घरी बसून चालवता येत नाही. लोकांना भेटून त्यांचे काम करावं लागते. खरी शिवसेना आपली आहे. पद आणि सत्ता मिळवण्यासाठी बाकिच्या काय केले, यावर बोलणार नाही. मीना कांबळी यांचे काम बघून बाळासाहेब ठाकरे त्यांना रणरागिणी म्हणत होते. सगळ्यांना सोबत घेऊन आपण टीम बनून काम करू. मी जरी मुख्यमंत्री असलो, तर मी कार्यकर्ता म्हणून काम करतो.'' (Latest Marathi News)

तत्पूर्वी आज उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या ठाण्यातील टेंभी नाका येथे दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. दुपारी त्यांनी देवीचं दर्शन घेतलं आणि सायंकाळी मीना कांबळी यांनी पक्ष सोडला. रश्मी ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर ठाणे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, "रश्मी ठाकरे या ठाण्यात स्टंट करण्यासाठी गेल्या, पण त्यांच्याच पक्षातील नेत्या आमच्या पक्षात आल्या आहेत. बाहेरच्या लोकांना घेऊन ते आरती करण्यास ठाण्यात गेल्या. पण देवीची आरती फक्त दोन वेळा होते. एक सकाळी आणि दुसरी संध्याकाळी, त्या दुपारी आरती करतात. त्यामुळे देवी आम्हाला पावली.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Fire : धाड धाड धाड...! साताऱ्यात भर बाजारपेठत एकावर गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: अजित पवारांवर टीका; आमदाराकडून संजय राऊतांची जीभ हासडण्याची भाषा

शनिशिगणापूरनंतर शिर्डीत ऑनलाईन गंडा,शिर्डी संस्थांनच्या नावानं बोगस वेबसाईट

Reservation Row: बंजारा,धनगरां विरोधात आदिवासी आक्रमक,आदिवासींची थेट मुंबईत धडक

Kidney Stone: किडनीसाठी घातक ठरतील 'हे' पदार्थ, आजच खाणं टाळा

SCROLL FOR NEXT