Thane to Mumbai AC bus : ठाण्यातून मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी बेस्टने खुशखबर दिली आहे. हा प्रवास आता आरामदायी होणार आहे. कारण, मंत्रालय ते बाळकुम ठाणे या मार्गावर एक जूनपासून एसी बस धावणार आहे. ही सेवा सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत चालवली जाईल. मंत्रालय ते बाळकुम यासह १३ मार्गावर (BEST new AC bus route) आता एसी बस धावणार आहे. याआधी या मार्गावर नॉन एसी बस होत. बेस्टकडून गुरुवारी या मार्गावर एसी बस धावणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
मंत्रालय ते बाळकुम नवीन एसी बस मार्ग A-490 ईस्टर्न फ्रीवे आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेमार्गे धावणार आहे. ठाण्यातून सकाळी ७:३० आणि ८:०० वाजता, तर मंत्रालयातून संध्याकाळी ५:३० आणि ६:०० वाजता एसी बस सुटतील. या मार्गावर एसी बसचे तिकिट ५० ते ६० रूपये इतके असेल. बेस्टने मुंबईमध्ये बऱ्याच कालावधीनंतर लांब पल्ल्याच्या मर्गावर एसी बस सुरू करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. बेस्ट अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एक जूनपासून काही मार्गावर एसी बस सुरू केल्या जाणार आहेत.
१ जून २०२५ पासून नॉन एसी बस बंद करून काही मार्गावर एसी बस सुरू करण्यात येणार आहेत. मंत्रालय ते शिवाजी नगर (A-8), काळाचौकी ते वरळी (44), वरळी डेपो ते वर्सोवा यारी रोड (56, फक्त रविवारी), नेव्ही नगर ते वरळी डेपो (125), आणि संताक्रूझ ते मालवणी (241, आधी माहीम ते मालवणी डेपो) या मार्गावर आता एसी बस सेवा सुरू होणार आहे.
याशिवाय, इतर मार्गांवरही एसी बस सेवा नव्याने सुरू केल्या जाणार आहेत. यात मालाड स्टेशन पश्चिम ते जनकल्याण नगर (243), गोरेगाव स्टेशन पूर्व ते फिल्म सिटी (343), गोरेगाव बस स्टेशन पूर्व ते संकल्प सोसायटी/नागरी निवारा प्रकल्प-४ (344), गोरेगाव बस स्टेशन पूर्व ते गोकुळधाम (347), गोरेगाव बस स्टेशन पूर्व ते मयूर नगर (452), मुलुंड रेल्वे स्टेशन ते मालवणी डेपो (459), कांजूरमार्ग ते हिरानंदानी पवई (602), आणि मालाड स्टेशन पश्चिम ते भुजले तलाव (626) यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.