19 year old falls into vitawa khadi  x
मुंबई/पुणे

Thane : तोल गेला अन् तरुण ट्रेनमधून थेट विटावा खाडीत पडला, मुलुंड-कळवा दरम्यान घडला भयंकर प्रकार

Thane News : एक तरुण लोकल ट्रेनने प्रवास करत होता. मुलुंड-कळवा दरम्यान तोल जाऊन हा तरुण ट्रेनमधून थेट विटावा खाडीत पडला. खाडीत पडलेल्या तरुणाला शोधण्यासाठी शोधमोहिम सुरु आहे.

Yash Shirke

  • ठाण्यातील मुलुंड-कळवा दरम्यान १९ वर्षीय तरुण ट्रेनमधून विटावा खाडीत पडला.

  • घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन दल, अग्निशमन दल व स्थानिक लोकांनी शोधकार्य सुरू केले.

  • तरुणाचा शोध घेण्यासाठी बोटींचा आणि विविध दलांचा उपयोग करताना मोठ्या प्रमाणात मोहिम राबवली जात आहे.

विकास काटे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Thane News : ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे जिल्ह्याच्या कळवा परिसरात असलेल्या विटावा खाडीत एक तरुण पडला. हा तरुण मुलुंड ते कळवा दरम्यान रेल्वेने प्रवास करत होता. तोल गेल्याने तो थेट रेल्वेतून खाली विटावा खाडीत पडला. खाडीत पडलेल्या तरुणाला शोधण्यासाठी शोध कार्य सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार,

आज (४ ऑगस्ट) दुपारी २.५५ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार, विटावा रेल्वे ब्रिज विटावा, कळवा, ठाणे (पश्चिम) या ठिकाणी आकाश शर्मा (वय - १९ वर्ष) हा मुलुंडवरुन कळव्याला ट्रेनमधून जात असताना तोल जाऊन ट्रेनमधून १ वाजताच्या सुमारास विटावा खाडीमध्ये पडला. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१ - पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान ०१ - फायर वाहनासह व ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान १ बससह उपस्थित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश शर्मा हा मुलुंड ते कळवा या दरम्यान रेल्वे ट्रेनने प्रवास करत होता. ट्रेन विटावा खाडीजवळ गेल्यानंतर त्याचा तोल गेला आणि तो थेट खाडीतच पडला. आकाश शर्मा हा कळव्यातील घोलाई नगर येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. हा तरुण खाली पडल्याची माहिती गौतम ठाकरे यांनी पोलिसांना आणि आपत्कालीन व्यवस्थापन दलाला दिली.

घटनेची माहिती मिळताच १९ वर्षीय तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात झाली. तरुणाचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी स्थानिक लोक, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने स्थानिक मच्छीमारांच्या दोन बोटीच्या सहाय्याने शोध कार्य सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

SCROLL FOR NEXT