Thane Ring Metro Route Saam TV
मुंबई/पुणे

Thane Ring Metro: रिंग मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास होणार सुलभ, २९किमी अंतरात असतील २२ स्थानकं; कुठे-कसा असणार मार्ग?

Thane Ring Metro Route: ठाणे शहरात इन्ट्रा सिटी मेट्रो मार्गिका उभारण्याचं काम सुरू आहे. यासाठी महामेट्रोने निविदा काढल्या आहेत. दरम्यान हा मार्ग कधी पूर्ण होणार आहे, किती खर्च लागेल ते जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • ठाणे रिंग मेट्रो मार्ग २९ किमी लांबीचा असणार.

  • एकूण २२ स्थानकं उभारली जाणार.

  • महामेट्रोकडून ८ स्थानकांसाठी निविदा जाहीर.

ठाणे शहराच्या अंतर्गत धावणारी ठाणे रिंग मेट्रो ठाणेकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. महामेट्रोने या प्रकल्पासाठी निविदा जाहीर केली आहे. या मेट्रो मार्गावरील ८ स्थानकांच्या बांधकामाबाबत निविदा काढली आहे. हा मार्ग एकूण २९ किमी लांबीचा असून या मार्गावर एकूण २२ स्थानकं असणार आहेत.

स्टेशन कुठे असतील

या २९ किमी लांब वर्तुळाकार मार्गासाठी एकूण १२,२००.१० कोटींचा खर्च येईल असं सांगितलं जात आहे. दरम्यान २९ किमी अंतराच्या या मार्गावर ८ स्टेशन ठाण्यामधील मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबीळ, वॉटरफ्रंट, पाटीलपाडा, ठाणे जंक्शन आणि नवीन ठाणे असे असणार. तर यातील ठाणे जंक्शन आणि ठाणे आणि न्यू ठाणे ही स्थानकं भूमिगत असणार आहेत. तसेच उर्वरित सहा स्टेशन उन्नत असतील. ठाण्यात वाघबीळ, विजय नगरी, डोंगरीपाडा, मानपाडा, गांधीनगर, वागळे इस्टेट कोळशेत, हिरानंदानी इस्टेट अशा गर्दीच्या ठिकाणांवरून ही मेट्रो जाणार आहे.

या इन्ट्रा सिटी मार्गिकेमुळे मेट्रो स्थानक, रेल्वे आणि बस स्थानकांशी थेट जोडली जाणार आहेत. मुंबई मेट्रो लाईन ४ आणि मुंबई मेट्रो ४अ जी गायमुख-वडाळा मार्गावर धावणार आहे, त्या मार्गिकेला जोडणार आहे. यासह ठाण्यापासून पुढे भिवंडीला जाणाऱ्या मेट्रो लाईन ५ लाही मार्गिका जोडली जाणार आहे.

या मेट्रोचं काम पावसाळ्यानंतर सुरू होईल अशी अपेक्षा आहे. काम सुरू होताच भुयारी स्थानकांचं काम पूर्ण करायला ५ वर्ष तर उन्नत स्थानकांचं काम पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. या भुयारी स्थानकांसाठी २२३.७० कोटींचा खर्च होणार आहे, उर्वरित स्थानकांसाठी २२८.४४ कोटी लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT