Thane Ring Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Ring Metro : २९ किमी लांब अन् २२ स्थानके; ठाणे रिंग मेट्रोच्या कामाचा मूहूर्त ठरला, वाचा संपूर्ण माहिती

Thane Internal Ring Metro Project: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे रिंग मेट्रोचं काम पुढच्या महिन्यापासून सुरु होणार आहे. या मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.

Siddhi Hande

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

ठाणे रिंग मेट्रो प्रोजेक्ट पुढच्या महिन्यात होणार सुरु

ठाण्यातील प्रवास सुखकर होणार

मुंबईत मेट्रोचे जाळे पसरत आहे. संपूर्ण मुंबई आता मेट्रोने जोडली जाणार आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसई-विरार येथेही मेट्रोचं काम सुरु होणार आहे. दरम्यान, ठाण्यातील रिंग मेट्रो प्रोजेक्ट लवकरच सुरु होणार आहे.

ठाण्यातील रिंग मेट्रो ही खूप महत्त्वाची ठरणार आहे. या मेट्रोमुळे प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे. रिंग मेट्रोमुळे ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे. हा रिंग मेट्रो प्रकल्पाचं काम पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. (Thane Ring Metro)

२९ किमीचा लांब कॉरिडोर

हा मेट्रो कॉरिडॉर २९ किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा शहराच्या पश्चिमेला वळण देईल. यामुळे वागळे इस्टेट, मानपाडा, ठाणे जंक्शन ही केंद्रे जोडली जाणार आहे. या प्रकल्पासाठी ऑगस्ट २०२४ मध्ये केंद्र सरकारने १२,२०० कोटी रुपये मंजुर केले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

२२ स्थानके

ठाणे रिंग रोड मेट्रोमध्ये एकूण २२ स्थानके असणार आहेत. यामधील दोन स्थानके ही अंडरग्राउंड असणार आहे.ठाणे जंक्शन आणि नवीन ठाणे ही मेट्रो स्थानके अंडरग्राउंड असणार आहेत. हा प्रकल्प उल्हास नदीपासून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत असणार आहे. ज्यामुळे ठाणे शहराच्या पश्चिम भागात कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे.

स्थानकांची नावे (Thane Ring Metro Stations List)

ठाणे रिंग मेट्रोमध्ये ठाणे जंक्शन, नवीन ठाणे, रैला नदी, वागळे इस्टेट, गांधी नगर, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाई नगर, नीळकंठ टर्मिनल, काशिनाथ घाणेकर थिएटर, मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबिल, वॉटर फ्रंट, डोंगरीपाडा या स्थानकांचा समावेश असणार आहे. कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकुम नाका, बाळकुम पाडा, राबोडी आणि शिवाजी चौक ही मेट्रो स्थानके २०२९ मध्ये येणार आहेत.

ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी चांगला आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय देणे हे यामागे उद्दिष्ट आहे. यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होईलच तसेच प्रवाशांनाही फायदा होईल. ही मेट्रो २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे?

Raj Thackeray: सुट्टी दिली नाही तर बॉसच्या कानाखाली मारा; राज ठाकरे असं का म्हणाले? VIDEO

Ind vs Aus Semi Final: ऑस्ट्रेलियाचा तडाखा, ३३९ धावांचं टार्गेट; भारत फायनल गाठणार का?

Rohit Arya Encounter: रोहित आर्यचा एन्काऊंटर कसा झाला? पवई गोळीबाराची इनसाइड स्टोरी

Raj Thackeray Speech : EVM व्होटचोरी डेमो ते १ तारखेचा मोर्चा; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT