Rain Accident News Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Thane rain : ठाण्यात पावसाचा पहिला बळी! १७ वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ

Thane rain news : मुंब्रा येथे साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने १७ वर्षीय आलियाचा दुर्दैवी मृत्यू झाला. टॉरेंट पॉवरच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Namdeo Kumbhar

17-year-old girl dies due to electric shock in Mumbra : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मुसळधार पावसादरम्यान साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने, त्याचा जोरदार धक्का लागून १७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण मुंब्रा परिसरात तीव्र खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी टॉरेंट पॉवर लिमिटेडच्या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

कामासाठी बाहेर पडली अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील यास्मीन पार्क (B-विंग) परिसरात राहणारी आलिया (वय १७ वर्षे) ही काही खासगी कामानिमित्त इमारतीबाहेर पडली होती. परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. याच साचलेल्या पाण्यात कुठूनतरी विजेचा प्रवाह (करंट) उतरला होता. पाण्यातून जात असताना आलियाचा या विजेच्या प्रवाहाशी संपर्क आला आणि ती जागीच गंभीररीत्या जखमी होऊन कोसळली.

रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली

घटना घडताच स्थानिक नागरिक आणि तिच्या कुटुंबीयांनी अत्यंत तातडीने आलियाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी तपासणीअंती तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या बातमीमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी आणि रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच निष्पाप मुलीला जीव गमवावा लागल्याचा आरोप काही स्थानिकांकडून केला जात आहे.

गुन्हा दाखल

आलियाच्या वडिलांनी त्यांच्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, रहिवाशांनी १५ जून रोजी कंपनीच्या अधिकृत व्हॉट्सॲप हेल्पलाइनद्वारे टॉरेंट पॉवरला वारंवार होणाऱ्या व्होल्टेजच्या चढ-उताराच्या समस्यांबद्दल कळवले होते. परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांनी टॉरेंट पॉवरच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पाण्यात विजेचा प्रवाह कसा?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी आलियाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पाण्यात विजेचा प्रवाह नेमका कशामुळे उतरला? याचा पुढील तपास पोलीस आणि संबंधित वीज विभागाचे अधिकारी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urinary Tract Infection: पावसाळ्यात वारंवार युरीन इन्फेक्शन होतंय? हा 1 देसी नुस्खा करेल तुमचा बचाव

Uddhav Thackeray : "सरकार तरुणाईला घाबरत आहे.." उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, २६ जुलैच्या मोर्चाची केली घोषणा

Spicy Cheesy Maggi Recipe : साध्या मॅगीला द्या लसणाचा तडका, रेसिपीची चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ शहादा शहर कडक बंद

आधार कार्ड हरवलंय? मग घरबसल्या २ मिनिटांत नवीन आधार करा डाऊनलोड

SCROLL FOR NEXT