Thane Railway Station Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Railway Station: जीवघेणा प्रवास! ठाणे रेल्वे स्थानकात एल्फिन्स्टनसारख्या दुर्घटनेचा धोका; पाहा भयंकर गर्दीचा व्हिडीओ

Viral Video: सोशल मीडियावर ठाणे रेल्वे स्थानकातील एक व्हिडीओ समोर आला आहे.

Ruchika Jadhav

Thane Railway Bridge:

कामावर जाण्यासाठी चाकरमानी दररोज लोकल ट्रेनने प्रवास करतात. सकाळी ८ ते १० या वेळेत रेल्वे स्थानकात तुडूंब गर्दी असते. या गर्दीमुळे काही प्रवाशांना दुखापत होते, तर आतापर्यंत काहींना जीवही गमवावा लागला आहे. सध्या सोशल मीडियावर ठाणे रेल्वे स्थानकातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ठाण्यातील गर्दीचे भीषण वास्तव पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

मध्यरेल्वेच्या अनेक स्थानकांची दुरावस्था झाली आहे. त्यासाठी कामे देखील सुरू आहेत. मात्र ठाणे रेल्वेस्थानकात यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होतायत. प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर मुंबईच्या दिशेने जाणारा पहिला ब्रिज एकाच बाजूने सुरू आहे. दुसऱ्या बाजूने या ब्रिजचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास होतोय.

एकाच वेळी दोन्ही फलाटांवर ट्रेन आल्याने दोन्ही ट्रेनची गर्दी या ब्रिजवर जमा होते. सीएसएमटी ट्रेन पकडण्यासाठी ब्रिजवरून खाली येणारे प्रवासी आणि वरती जाण्यासाठी घाई करणारे प्रवासी एकाच ब्रिजवर जमा होतात. हा ब्रिज फार लहान असल्याने मोठी गर्दी आणि काही प्रमाणात चेंगराचेंगरी देखील होते. शुक्रवारी या ब्रिजवर मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

दोन्ही बाजूने नागरिकांनी गर्दी केली होती. ब्रिज खाली एक सुरक्षा रक्षक तैनात असून गर्दी अटोक्याबाहेर गेली. यामध्ये तोल जाऊन काही व्यक्ती पडण्याचीही शक्यता होती. ठाणे स्थानकातील या ब्रिजचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे काम पूर्ण कधी होणार आणि नागरिकांची जीवघेण्या गर्दीतून सुटका कधी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काही वर्षांपूर्वी मुंबईच्या एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील ब्रिजवर मोठी दुर्घटना घडली होती. पूल पडला अशी अफवा पसरल्याने यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला. अशी घटना ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरील ब्रिजवर घडण्याची शक्यता असल्याची भीती काही प्रवाशांनी व्यक्त केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

Onion Juice: जाड अन् घनदाट केस हवीयेत? लावा कांद्याचा रस, काही दिवसातच दिसेल फरक

SCROLL FOR NEXT