Eknath Shinde Ganesh Naik Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Politics : 'ठाणे'दार शिंदे की नाईक? आनंद दिघेंनंतर गणेश नाईक एकनाथ शिंदेंशी भिडणार?

Eknath Shinde Ganesh Naik : भाजपने मित्रपक्ष शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी शिंदेंचे पारंपरिक विरोधक नाईकांना ताकद दिलीय. मात्र शिंदे आणि नाईकांमधील वाद काय आहे? ठाणं नेमकं कुणाचं? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Thane Politics : गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याचं जाहीर केलं आणि शिंदे आणि गणेश नाईकांमधील वादाचा नवा अंक सुरु झालाय. निवडणुकीपुर्वीच कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटातील वाद टोकाला गेला होता. तो वाद मिटवण्याचा प्रयत्नहीकेला गेला होता. मात्र आता महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने शिंदेंना शह देण्यासाठी नवी मुंबईच्या गणेश नाईकांना मैदानात उतरवल्याने हा वाद आणखीच उफाळून आलाय. मात्र गणेश नाईकांविरोधातील वाद हा आत्ताचा नसून वर्चस्वाची ही लढाई थेट आनंद दिघेंच्या काळापासून सुरु आहे.

शिंदे - नाईकांमधील वादाचा इतिहास

- 1995 - ठाण्याच्या पालकमंत्रिपदामुळे नाईक आणि आनंद दिघेंमध्ये वादाची ठिणगी

- 1999 - नाईकांनी शिवसेना सोडल्यानंतर दिघेंकडून भोईरांना ताकद देत नाईकांचा पराभव

- 2004 - पालकमंत्री असताना नाईकांकडून शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न

- 2009 - संजीव नाईकांना खासदार बनवून शिवसेनेला हादरा

- 2014 - शिंदेंनी भाजपच्या मंदा म्हात्रेंच्या मागे ताकद उभी करुन नवी मुंबईत नाईकांना पराभूत केलं

- 2019 - शिंदे नगरविकास मंत्री असताना नवी मुंबईत नाईकांची कोंडी करण्याचा प्रयत्न

- 2024 - भाजपच्या नाईकांचा विरोध असताना कल्याणमधील गावं नवी मुंबई महापालिकेत सहभागी करण्याची परवानगी

गणेश नाईक 15 वर्षे ठाण्याचे पालकमंत्री होते. या काळात ठाण्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यात कधी नाईक तर कधी शिंदे यशस्वी ठरले. मात्र आता शिंदेंची मुख्यमंत्रिपदावरुन गच्छंती झाल्यानंतर आता शिंदेंना आपला ठाण्याचा गड राखण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंचे गुरु आनंद दिघेंपासून सुरु झालेला नाईकांविरोधातील संघर्ष आता आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यात शिंदेंना ठाकरे गटापेक्षा गणेश नाईकांचं मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे जुना संघर्ष शिंदे नव्याने कसा हाताळणार? आणि आपला गड राखणार का याकडे लक्ष लागलंय...कारण यातूनच ठाण्याचा भाई कोण? हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT