ठाण्यात महिला सहाय्यक आयुक्तांवर हल्ला  विकास काटे
मुंबई/पुणे

ठाण्यात महिला सहाय्यक आयुक्तांवर हल्ला

पिंपळे यांची दोन तर बचाव करणाऱ्या अंगरक्षकाचेही एक बोट कापले, फेरीवाला पोलिसांच्या ताब्यात

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

ठाणे : कासावडवली भागातील मार्केट परिसरात अनाधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या माजिवडा मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे कापली गेली आहेत. तर त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या अंगरक्षकावर देखील हल्ला करण्यात आला आहे.

त्याचे देखील एक बोट कापले गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर आता येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याला कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सांयकाळी ६.३० च्या सुमारास घडली आहे. या घटनेत हल्ला करणाऱ्या अमरजीत यादव याला पोलिसांनी मोठय़ा शिताफीने अटक केली आहे.

पहा व्हिडिओ-

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील अनाधिकृत बांधकामांपाठोपाठ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार मागील आठवडय़ापासून ही कारवाई सुरु आहे. अशाच प्रकारे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांच्या पथकाने घोडबंदर भागातील कासारवडवली या ठिकाणी मुख्य मार्केटमध्ये पदपथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते.

सांयकाळी ६.३० च्या सुमारास ही कारवाई सुरु होती. त्यावेळेस एका फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पथक पुढे सरसावत असतांनाच संतप्त झालेल्या फेरीवाल्याने, रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकू हल्ला केला आहे. फेरीवाल्याने त्यांच्या डोक्यावर चाकू भिरकवला असता, त्याचवेळेस हल्यामुळे बचाव करण्यासाठी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवला.

त्यामध्ये हा हल्ला त्यांच्या हातावर झाला आणि त्यामध्ये त्यांच्या डाव्याहाताची दोन बोटे कापली गेली ती तुटुन खाली पडली. तर या हल्याचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्यांच्या अंगरक्षकाच्याही डाव्या हाताचे एक बोट कापले आहे. अखेर अमरजित यादवला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अटक केली आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होम लोन, कार लोन झालं स्वस्त; नवरात्रीआधी 'या' बँकेने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

iPhone 17 Series launch: खास डिझाइन, आकर्षक फिचर्स, iPhone 17 आज येतोय, किंमत किती असणार? VIDEO

Kajal Aggarwal : काजल अग्रवालच्या मृत्यूची अफवा, नेमकं काय आहे सत्य?

Zilha Parishad School : झेडपीच्या शाळेचा चेहरामोहरा बदलला, दौंडमधील मेमानवाडीच्या शाळेची जोरदार चर्चा, मुलं जर्मन बोलतात... वाचा

SCROLL FOR NEXT