सांगलीत बैलगाडा शर्यत प्रेमींचा मोर्चा तर ठाण्यातील शेतकरी आक्रमक

तालुक्यातील सर्व बैलगाडी धारक शेतकरी तसेच बैलप्रेमी मोठ्या संख्येने या मोर्चास सहभागी झाले.
सांगलीत बैलगाडा शर्यत प्रेमींचा मोर्चा तर ठाण्यातील शेतकरी आक्रमक
सांगलीत बैलगाडा शर्यत प्रेमींचा मोर्चा तर ठाण्यातील शेतकरी आक्रमक Saam Tv
Published On

विजय पाटील/ प्रदिप भणगे

सांगली कर्नाटक आणि तामिळनाडूच्या धर्तीवर बैलगाडी शर्यतीला शासनाने तात्काळ परवानगी द्यावी, या मागणीसाठी आज सांगलीच्या पलूस मध्ये शेकडो बैलप्रेमींसह भव्य बैलगाडी मोर्चा निघाला तर आपल्या मागण्याच निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

सकाळ पासूनच बाजार समिती पलूस येथे नागरिकांनी मोर्चा साठी गर्दी केली होती. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बैलगाडी धारक शेतकरी तसेच इतर नागरिक बैलगाडी सहित सहभागी झाले होते. तर या मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, भिलवडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी केले होते.

सांगलीत बैलगाडा शर्यत प्रेमींचा मोर्चा तर ठाण्यातील शेतकरी आक्रमक
दरोडा घालण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले

तालुक्यातील सर्व बैलगाडी धारक शेतकरी तसेच बैलप्रेमी मोठ्या संख्येने या मोर्चास सहभागी झाले. तर पलुस भिलवडी कुंडल पोलिस स्टेशनच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर तहसीलदार निवास ढाणे यांनी मोर्चाचे निवेदन स्विकारले. कोल्हापूर पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शेतकरी आणि बैलगाडा चालक आक्रमक झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शेतकरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. कोल्हापूर मध्ये आणि राज्यातील इतर ठिकाणी बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी शेतकरी आणि चालक आक्रमक झाले आहेत. त्यातच आता ठाणे जिल्ह्यातील शेतकरी हे सुद्धा आक्रमक झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शेतकरी आणि बैलगाडा चालकांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली आहे. आणि बैलगाडा शर्यत पुन्हा सूरु करण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती यावेळी त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी याबाबतचे पत्र सुद्धा मनसे आमदार राजू पाटील यांना दिले आहे. तर मनसे आमदार राजू पाटील यांनी शेतकऱ्यांचे आणि बैलगाडा चालकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि याबाबत मी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याशी बोलतो आणि आपण त्यांना भेटायला सुद्धा जाऊ असे सांगितले आहे. यावेळी संदीप माळी, सचिन सरनोबत, विलास पाटील, सुनील मुंडे आणि शेतकरी उपस्थित होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com