Thane-Kalyan Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Thane-Kalyan Rain: ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, रस्त्यांना तळ्याचे स्वरुप

Maharashtra Weather Update: ठाण्यासह डोंबिवली, कल्याण आणि उल्हासनगरमध्ये दुपारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे.

Priya More

ठाण्यासह कल्याण आणि डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे याठिकाणावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह प्रवाशांचे हाल होत आहे.

ठाण्यामध्ये मुसधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे ठाण्याच्या वंदना सिनेमा परिसरासह बाजारपेठ, राम मारुती रोड, नौपाडा, घोडबंदर रोडच्या काही भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. या परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. आज सकाळपासून ठाण्यामध्ये ढगाळ वातावरण होते. अचानक दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या ठाणेकरांची तारांबळ उडाली. गेल्या तासाभरात झालेल्या १५ मिलिमीटर पावसाने ठाणे शहराच्या नालेसफाईची पॉलखोल केली आहे.

तर दुसरीकडे कल्याणसह डोंबिवली परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी अचानक जोरदार पावसाला सुरूवात झाली. अर्ध्या तासापासून पडणाऱ्या पावसामुळे कल्याण, डोंबिवलीमध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. या पावसाने कल्याण, डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात चांगलाच जोर धरला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे कल्याणसह डोंबिवलीकरांचे चांगलेच हाल होताना दिसत आहे. या पावसामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

तर उल्हासनगरमध्ये देखील काही वेळापूर्वी पावसाला सुरुवात झाली. उल्हासनगरच्या अनेक परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अचानक आलेल्या पावसाने उल्हासनगरच्या नागरिकांची चांगली तारांबळ उडाली. सकाळपासूनच उल्हासनगर शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारपासून पावसाला सुरूवात झाली असून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड – चाकण वाहतूक कोंडीविरोधात मोर्चा

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT