मुंबई/पुणे

मोठी बातमी! किल्ले, धरणं, धबधबे सर्व पर्यटकस्थळं बंद; ठाणे प्रशासनाचा मोठा निर्णय

Thane Administration Bans Entry to Tourist Destinations: मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे हवामान विभागाने (IMD) 'रेड अलर्ट' जारी केला आहे. ठाणे प्रशासनाने सर्व किल्ले, धरणे, धबधबे आणि पर्यटन स्थळे बंद केली आहेत.

Bharat Jadhav

  • नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन

  • ठाणे जिल्ह्यातील सर्व किल्ले, धरणे, धबधबे आणि पर्यटनस्थळे बंद करण्यात आली.

  • ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा आदेश जारी केला.

राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे बहुतेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी दरड कोसळत आहेत. मुंबई पुण्यातील रस्त्यांना नदीचं स्वरुप आलंय. त्याच दरम्यान भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केलाय. ताशी 80 ते 90bकिलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. याचमुळे दक्षता म्हणून ठाणे प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद केली आहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेत.

हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठीदेखील रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. शहरातील सखल भागात पाणी साचलंय. झाडे उन्मळून पडली आहेत. वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होणे अशा घटना घडलेल्या आहेत. हीच बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने तडकाफडकी मोठा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश काय?

ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. पावसाळ्यात येथील धबधबे, धरणे, तलाव, नदीकाठ अशा ठिकाणी पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. या ठिकाणी अतिवृष्टी कालावधीत धबधब्याच्या ठिकाणी दरड कोसळणे, धरण, तालावमध्ये पोहोण्यासाठी गेलेल्या व्यक्ती बुडणे तसेच गड किल्यावर पायवाट घसरड्या होऊन अपघात होणे, अशा घटना आधीही घडलेल्या आहेत.

यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेत नागरिकांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे प्रतिबंधित करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng T20 : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज ठरला व्हिलन, तिसऱ्या टी २० मध्ये डच्चू मिळणार; प्लेइंग इलेव्हन बदलणार

Hair Care: महिन्याभरात झपाट्याने वाढतील केस; आठवड्यातून २ वेळा हे तेल नक्की लावा

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीमुळे वरंधा घाट ३१ ऑगस्टपर्यंत बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Badlapur Hidden Waterfalls: कोंडेश्वर ते नाणेघाट... बदलापूरजवळचे ८ अप्रतिम धबधबे; गर्दीपासून दूर निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्या

Weight Loss Ice Cream Recipe : आईस्क्रीम खाऊनही वजन होईल कमी, वाचा 'ही' सीक्रेट रेसिपी

SCROLL FOR NEXT