Kalwa Hospital News Saamtv
मुंबई/पुणे

Kalwa Hospital News: धक्कादायक! कळवा रुग्णालयात उपचाराअभावी ५ रुग्णांचा मृत्यू.. नातेवाईकांचा आक्रोश; जितेंद्र आव्हाड संतापले

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital Thane: ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अंदागोंदी कारभार समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Thane Kalwa Hospital News: ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अंदागोंदी कारभार समोर आला आहे. गुरुवारी दिवसभरात रुग्णालयात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराअभावी या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला असून रुग्णालय परिसरात आक्रोश करून गोंधळ घातला. या संपूर्ण प्रकारवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ठाणे (Thane) शहरातील गोरगरीब रुग्णांसह जिल्ह्यातील रुग्णांचे आधारवड म्हणून ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे पहिले जात आहे. मात्र या रुग्णालयात काल (10,ऑगस्ट) ला एक धक्कादायक प्रकार समोर आला. गुरूवारी रुग्णालयात एकाच दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू झाला.

उपचाराअभावी हे रुग्ण दगावल्याचा आरोप रुग्णालयाच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबतची माहिती मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रुग्णालयात धाव घेत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. परंतु दगावलेले रुग्ण हे गंभीर होते असे म्हणत रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

ट्वीट करत आव्हाडांचा संताप...

"गेली अनेक दिवस झाले ठाण्यातील शिवाजी रुग्णालया बाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या.आज एका महिलेचा फोन आला की,तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत,परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये.काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता,रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो,तळपायाची आग मस्तकात गेली.

"मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात येते.तिथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात.या गंभीर रुग्णांना,दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकण्यात येतो.आज दिवसभरात या रुग्णालयात 5 रुग्ण दगावले आहे..." असे संतप्त ट्वीट आव्हाडांनी केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT