Thane Municipal Corporation  Saam tv
मुंबई/पुणे

Thane Municipal Corporation : महायुतीत रंगणार संघर्ष, ठाण्याचा गड कोण राखणार? ठाकरे बंधूंची जादू चालणार का?

Thane Municipal Corporation Election 2025: ठाण्यात महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा ठाणे महापालिकेत ठाकरे बंधूंची जादू चालणार का, याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

विकास काटे, ठाणे

सुप्रीम कोर्टाकडून महापालिका निवडणुकांसाठी तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

ठाण्यात राजकीय फोडाफोडीचं राजकारण तापलंय

महायुती किंवा मैत्रीपूर्ण लढतीबाबत अनिश्चितता

ठाणे : पुढील तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य निवडणुका मार्गी लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय कारभार सहन करणाऱ्या माजी नगरसेवकांच्या आशा या निमित्ताने पल्लवीत झाल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात पक्ष फोडाफोडीच्या राजकारण पाहायला मिळत आहे. कळव्याच्या माध्यमातून ठाणे महापालिकेवर कमळ फुलविण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपला शिंदे सेनेने जोरदार धक्का दिला आहे. आगामी निवडणुकीमुळे साऱ्यांचं लक्ष ठाण्याकडे लागलं आहे.

मागील सुमारे २९ वर्षे ठाणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने एकहाती सत्ता संपादित केली होती. परंतु मधल्या काळात राजकीय समीकरणे बदलली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागली गेला. तरीही ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वरचष्मा ठेवल्याचे दिसून येत आहे.

शिंदे गटाकडे ठाण्यात सध्या ६७ पैकी जवळजवळ ६५ माजी नगरसेवकांचं पाठबळ आहे. तसेच इतर पक्षातून आलेल्या माजी नगरसेवकांमुळे ही संख्या ७८ या मॅजिक फिगरपर्यंत पोहचली आहे. कळव्यातील आजी-माजी असे १८ माजी नगरसेवक आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आणि संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी मागील तीन महिन्यापासून जोरबैठका सुरु केल्या होत्या. परंतु शिंदेंनी एका रात्रीत भाजपचा भ्रमाचा भोपळा फोडला. त्यांनी १८ पैकी पहिल्या टप्यात ७ माजी नगरसेवकांना आपल्या तंबुत आणले.

याआधी वर्तकनगर भागातील माजी नगरसेवकाच्या पत्नीला गळाला लावून पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित केलेल्या भाजपला शिंदे सेनेने धक्का देऊन तिला आपल्याकडे वळते केले होते. एकीकडे ठाण्यासह जिल्ह्यात भाजपचे विधानसभा निवडणुकीनंतर प्रस्थ वाढलं आहेय किंबहुना शतप्रतिशत यश भाजपने मिळवलं आहे.

राज्यात आगामी महापालिका निवडणुका या महायुतीत लढल्या जातील, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील, असे सुतोवाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. परंतु ठाण्यात महायुतीत या निवडणुका लढवल्या जाणार की मैत्रीपूर्णपणे लढल्या जाणार हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. कळव्यातील माजी नगरसेवक आमच्याकडे येणार होते, असे भाजपनं देखील आता मान्य केलं आहे. परंतु असे असले तरी आजही भाजपचा स्वबळाचा दावा कायम आहे.

भाजपमध्ये देखील मागील काही काळात इनकमिंग करण्याच्या संख्या वाढली आहे. एका एका प्रभागात आठ ते दहा जण इच्छुकांच्या शर्यतीत आहेत. त्यात युती केल्यास या नाराजांच्या नाराजीचा फटका सहन करावा लागण्याची भीती देखील भाजपला आहे. त्यामुळेच कदाचित ते स्वबळाचा नारा देत आहेत, असेच यातून स्पष्ट होत आहे.

आगामी काळात फोडाफोडीचे राजकारण आणखी तापणार असून कळवा हातून गेला असला तरी घोडबंदर फोडण्यासाठी आता भाजपचे प्रयत्न सुरु झाले आहेत. परंतु शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या या फोडाफोडीची राजकारणात अजित पवार गट हा अलिप्त असून शरद पवार गटाचे देखील अवसान गळाले आहे. ठाकरे गटाला तर उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे.

ठाण्यातील वाहतूक कोंडी, पार्किंग, कचऱ्याची समस्या, डम्पिंग ग्राऊंड नसणे, पाण्याची समस्या, रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या, अनधिकृत इमारतींची समस्या या प्रमुख आहेत.

ठाणे - 130 वॉर्ड

पक्षीय बलाबल

शिवसेना - ६७

भाजप 23

राष्ट्रवादी - ३५

काँग्रेस -03

एमआयएम - ०२

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Students Death : शाळेत परिक्षा देऊन पोहायला गेले अन् घात झाला, बारावीतील ५ विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू

...तर शिवसेना शाखेत आणून द्या; बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये मोदी सरकारने पाठवले - उद्धव ठाकरे|VIDEO

SC आरक्षणात होणार मोठा बदल; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी हिंट

Mumbai Tourism : मजा-मस्तीसोबत अभ्यासही होईल, पालकांनो मुलांसोबत मुंबईतील 'या' ठिकाणी एकदा जा

Maharashtra Live News Update: - कॉन्स्टेबल मंजू मालिका आता ''इन्स्पेक्टर मंजू" नावाने 29 सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला.

SCROLL FOR NEXT