ठाण्यातील मुंब्रा येथे दिवसाढवळ्या घडली गोळीबाराची घटना
मुंब्रा शहरात तिघांवर गोळ्या झाडल्या; एकाचा मृत्यू
महिलेच्या छेडछाडीच्या वादातून घटना घडली
ठाण्यातील मुंब्रा शहरात गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. मुंब्रा येथील कैलासनगरमध्ये गुरुवारी सकाळी गोळीबाराची घटना घडली आहे. एकाने तिघांवर गोळ्या झाडल्या. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले आहेत. मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या प्रकारातून हा प्रकार तपासातून समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील कैलासनगर भागातील सुमनताई चव्हाण हिंदी शाळेजवळ हा प्रकार घडला. जयन नायर (५१) याच्या मानलेल्या बहिणीची छेड काढण्यात आली होती. या कारणावरून जयनचा काही तरुणांशी वाद झाला. वाद चिघळल्यानंतर त्याने रागाच्या भरात तिघांवर गोळीबार केला. गोळीबारात अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख गंभीर जखमी झाले.
गोळ्या झाडल्यानंतर जयनने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन हत्यारासह अटक केली. जखमींना मुंब्र्यातील काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या गोळीबारात अकबर अब्दुल शेख यांचा मृत्यू झाला. तर दोघांवर उपचार सुरू आहेत. गोळीबाराच्या घटनेने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
काय आहे प्रकरण?
तिघांनी मानलेल्या बहिणीची छेड काढल्याने भडकलेल्या जयन नायरने गोळीबार केला. या गोळीबारात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी जयन नायरला अटक केली आहे, अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काही दिवसांपूर्वी रील स्टार नदीम खान उर्फ बाबा खान याच्या कारवर गोळीबार झाला होता. या घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी धाव घेतली. त्यावेळी आरोपींनी पोलिसांच्या दिशेने ५ गोळ्या झाडल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.