Malshej Ghat road accident Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Malshej Ghat : माळशेज घाटाजवळ एसटी बसचा भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

Malshej Ghat road accident Today : मुरबाडजवळ माळशेज घाट महामार्गावर एसटी बस आणि स्कॉर्पिओची भीषण धडक होऊन ३ जणांचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

फय्याज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

Murbad ST bus Scorpio accident latest update : मुरबाड-माळशेज घाट महामार्गावरील वैशाखरे वळणावर आज काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला. एसटी बस आणि स्कॉर्पिओ कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर एका लहान मुलासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर वैशाखरे वळणाजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच टोकावडे महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.

आज सकाळी कल्याणहून अहिल्यानगरच्या दिशेने जाणारी एसटी बस वैशाखरे येथील वळणावर आली होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या स्कार्पिओसोबत बसची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चुराडा झाला. या अपघातात स्कार्पिओमधील एका पुरुषाचा आणि महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारावेळी मृत्यू झाला.

या अपघातात एका लहान मुलासह पाच जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना गाडीबाहेर काढले. सर्व जखमींना उपचारासाठी टोकवडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे कल्याण-नगर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत, दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात २६ मे पासून वाढ

Crime: शिंदेसेनेच्या आमदाराच्या PA ला गोव्यात मारहाण, कुटुंबीयांनाही सोडलं नाही

Palak Paneer Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल स्वादिष्ट पालक पनीर रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

वंशाचा दिवा मुलगाच हा समज खोटा, विज्ञानाने दिला धक्का; आईकडूनच पुढे जातो खरा DNA

Keratin vs Hair Botox: केराटिन आणि हेअर बोटॉक्समध्ये नेमका काय फरक? केसांसाठी काय ठरतं फायदेशीर?

SCROLL FOR NEXT