Five People Drown in Two Separate Incidents in Thane AI Image
मुंबई/पुणे

Thane : भीषण दुर्घटना! ठाण्यात ५ जणांचा बुडून मृत्यू, पोहायला गेले ते परत आलेच नाहीत

Thane News : ठाण्यात रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडण्याच्या दुर्घटनांत ५ जणांचा मृत्यू झाला. रेतीबंदर खाडीत तिघांचा, तर अकलोली येथील तानसा नदीत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत झाला.

Alisha Khedekar

  • ठाण्यात ५ जणांचा बुडून मृत्यू

  • दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या घटना

  • दोन्ही घटनांमुळे ठाणे आणि भिवंडी परिसरात हळहळ

  • पोलीस तपास सुरु

ठाण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. मुंबई-नाशिक महामार्गालगत रेतीबंदर परिसरातील खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. तर भिवंडी तालुक्यातील अकलोली येथे तानसा नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेतीबंदर परिसरातील गणेश विसर्जन घाटाजवळ रविवारी दुपारी तीन जण खाडीत पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी आलम सय्यद (४२), रिझवान सय्यद (४२) आणि साहिल पोलंदास (३०) हे तिघेही पाण्यात बुडाले. तिघेही मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. दुपारी सुमारे ३ वाजून ८ मिनिटांनी तीन जण खाडीत बुडाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. त्यानंतर प्रशासनाच्या पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. जवानांनी सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर ४ वाजून २० मिनिटांच्या सुमारास तिघांना पाण्याबाहेर काढले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, दुसरी घटना भिवंडी तालुक्यातील अकलोली येथे घडली. विरार येथील रिक्षाचालक राम बच्चन चौहान हे कुटुंबासह वज्रेश्वरीजवळील प्रसिद्ध गरम पाण्याच्या कुंडावर आंघोळीसाठी आले होते. कुंडात आंघोळ केल्यानंतर कुटुंबीय तानसा नदीच्या काठावर गेले. त्यावेळी अरुण चौहान (१३) आणि आयुष चौहान (१०) हे दोघे भाऊ नदीत आंघोळीसाठी उतरले. मात्र नदीच्या पाण्याची खोली लक्षात न आल्याने दोघेही बुडू लागले. त्यावेळी आई खाण्यासाठी खाऊ आणायला बाजूला गेली होती, तर वडील रिक्षाची साफसफाई करत होते. त्यामुळे मुलांकडे त्यांचे लक्ष गेले नाही.

काही वेळाने दोन्ही मुले दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. सुमारे तासाभराच्या शोधानंतर दोन्ही भावंडे नदीत आंघोळ करत असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर आढळली. त्यांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या प्रकरणी गणेशपुरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT