Shreya Maskar
रात्रीच्या वेळी मुंबईचे रूप पूर्णपणे बदलते. दिवसाची धावपळ आणि गोंधळ मावळून समुद्राच्या मंद वाऱ्याची जादू आणि लखलखणाऱ्या प्रकाशाचे जिवंत, सुंदर दृश्य अनुभवता येते.
मरीन ड्राइव्ह रात्रीच्या दिव्यांमुळे 'क्वीन्स नेकलेस'सारखा दिसतो. समुद्राची गार हवा, चमचमणारी शहराची रोषणाई आणि शांतपणे बसण्यासाठीचा परिसर यामुळे हे ठिकाण खास आहे.
अपोलो बंदर परिसरातील गेटवे ऑफ इंडिया रात्री रोषणाईत अत्यंत सुंदर दिसतो. रात्री येथे वास्तूची भव्यता आणि समुद्राचा नजारा एकत्र अनुभवता येतो.
समुद्राच्या लाटांचा आवाज, खडकाळ किनारा आणि दूरवर दिसणारी शहराची रोषणाई यामुळे बांद्रा येथील बँडस्टँड येथे रात्रीचा माहोल वेगळाच जाणवतो.
मरीन ड्राइव्हच्या दक्षिण टोकाजवळील नरीमन पॉइंटवरून मुंबईची रात्रीची स्कायलाइन पाहता येते. उंच इमारतींची रोषणाई आणि अरबी समुद्राचा विस्तीर्ण नजारा फोटोग्राफीसाठी मिळतो.
गिरगाव चौपाटी परिसरातून रात्री समुद्र आणि मुंबईच्या रोषणाईचा आनंद घेता येतो. जवळच मिळणाऱ्या स्ट्रीट फूडमुळे समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ आणखी खास होते.
बांद्रा-वरळी सी लिंक आधुनिक वास्तूंपैकी एक आहे. येथील रात्रीची रोषणाई पाहायला पर्यटक आवर्जून येतात. मित्रमंडळींसोबत निवांत वेळ घालवता येतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.