Thane Diwali 2023
Thane Diwali 2023 Saam TV
मुंबई/पुणे

Thane Diwali 2023: ठाण्यात दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा सजल्या! गतिमंद मुलांनी बनवलेल्या कंदिलांना मोठी मागणी

विकास काटे, ठाणे

Thane Diwali 2023:

ठाण्यातील विश्वास गतिमंद केंद्रातील मुलांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पांरपरिक, असे कंदील तयार केले असून खणापासून तयार केलेले तोरण , झुंबर आणि लटकन यांना यंदा देखील विशेष मागणी आहे.

विश्वास गतिमंद केंद्र गतिमंद मुलांसाठी कार्यरत आहे. या विशेष मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम या केंद्राच्या वतीने राबविले जातात. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा. तसेच बुद्धीला चालना मिळावी याकरिता विविध वस्तू येथे मुलांकडून बनविल्या जातात. गेल्या ३३ वर्षापासून विश्वास गतिमंद केंद्र मुलांसाठी कार्यरत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुले परपरिक कंदील बनविण्यात व्यस्त आहेत. रंगीत पेपर आणि कार्ड पेपर यापासून हे कंदील बनविण्यात आले आहेत. कंदील सोबत घराच्या सजावटीच्या वस्तू ही मुलांनी साकारल्या आहेत. पणत्या, तोरण, झुंबर ,भेट पाकीट, यांसारख्या वस्तू बनविल्या आहेत.  (Latest Marathi News)

तसेच भेटवस्तू म्हणून देण्यासाठी कापडी बॅग बनविल्या आहेत. लोकरीचे गोंडे, मणी, खानचे कापड यापासून तोरण आणि शोभेच्या वस्तू बनविल्या आहे. आतापर्यंत मुलांनी पारंपरिक असे ८० हून अधिक पारंपरिक कंदील बनविले आहे. तसेच सोसायट्यामध्ये या कंदीलची मागणी आधिक आहे.

अशा प्रकारच्या ऑर्डर मधून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो, शिवाय त्यांचा उत्साह ही वाढतो असे ट्रस्टी जोत्सना प्रधान यांनी म्हंटले आहे. शिवाय नागरिकांनी हे कंदील घ्यावे, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse: आरोपी भावेश भिंडेंच्या वार्षिक कमाईची माहिती आली समोर, पुणे महापालिकाही अलर्ट मोडवर

Panchganga River: पंचगंगेच्या प्रदूषणावरुन नागरिकांत संताप, महामंडळाचे दुर्लक्ष हजारो मासे मृत्यूमुखी

Vicky Kaushal : मुंबईच्या चाळीत जन्मलेला विकी कौशल आज गाजवतोय बॉलिवूड!, जाणून घ्या अभिनेत्याविषयी Unknown Facts

Buldhana News: धक्कादायक! शेगाव एस. टी. आगाराचा कारभार प्रशिक्षणार्थींच्या हातात; प्रवाशांच्या जिवाशी खेळ

Morning Drinks: दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी सकाळी 'या' पेयांचे करा सेवन, शरीर राहील निरोगी

SCROLL FOR NEXT