Pradip Purnekar Case Saam T
मुंबई/पुणे

Pradip Purnekar Case: प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येमागं कुणाचा हात? ठाकरेंच्या नेत्याने थेट नाव सांगत केला धक्कादायक खुलासा

Thane Politics: ठाण्यामध्ये ठाकरेसेनेचे नेते प्रदीप पुर्णेकर यांची हत्या करण्यात आली. ऑफिसमध्ये घुसून गोळ्या झाडून त्यांना जागीच संपवण्यात आले. या घटनेमुळे राजकारण तापले आहे.

Priya More
  • ठाण्यात ठाकरेसेनेच्या नेत्याची हत्या

  • प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येनंतर राजकारण तापले

  • प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येमागे शिंदेसेनेच्या नेत्यांचा हात

  • संजय राऊत यांचा गंभीर आरोप

  • प्रदीप पुर्णेकर हत्याकांडात मीनाक्षी शिंदेंवर आरोप

ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पुर्णेकर यांची मंगळवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या हत्याकांडाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत शिंदेसेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. अशातच आता ठाकरेसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देत या हत्याकांडाचा खरा सूत्रधार शिंदेसेनेत असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. याचसोबत राज्याच्या गृहमंत्र्यांचा कारभार लज्जास्पद असल्याचे म्हणत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

संजय राऊत यांनी सांगितले की, प्रदीप पुर्णेकर यांच्यावर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्याचे सूत्रधार शिंदेसेनेत आहेत. प्रदीप पुर्णेकरांनी निवडणूक लढवली होती. थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. माजी महापौर मिनाक्षी शिंदेंसोबत त्यांचा राजकीय संघर्ष सुरू होता. बिल्डरांच्या माध्यमातून लोकांना बेघर करण्याचं काम तिथे सुरू होतं. मनोरमानगरमध्ये बिल्डरांना वसाहती निर्माण करायच्या होत्या. त्याविरोधात प्रदीप पूर्णेकर लढत होते. त्या भागाचा तबाब ड्रग्स रॅकेटर्सनी घेतला होता. या रॅकेटर्सना शिंदेगटाच्या लोकांचा पाठिंबा होता. या रॅकेटविरोधात पूर्णेकर यांनी लढा उभारला होता. त्यांनी सातत्याने या विरोधात पोलिसांना तक्रारी दिल्या होत्या.'

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत थेट पुर्णेकरांच्या हत्येमागच्या सूत्रधाराचे नाव सांगितले. ते म्हणाले की, 'प्रदीप पूर्णेकर सामाजिक भान ठेवून काम करत होते. ते लोकांना बेघर करणाऱ्यांच्या विरोधात लढत होते. त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचू लागला तेव्हा त्यांची हत्या करण्यात आली. पुर्णेकर यांच्या हत्येमागे मिनाक्षी शिंदे, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांनी पोसलेले गुंड जबाबदार आहेत. त्याची फडणवीस यांना लाज वाटायला पाहिजे. ठाण्यात कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत हस्तक्षेप करू शकत नसाल तर फडणवीसांची नोंद लज्जास्पद गृहमंत्री होईल. पण शेवटी ही मोदी शाहांची पिलावळ असल्याने लाज वाटणार नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितृपक्षात दिसणारे 'हे' ५ संकेत मानले जातात शुभ, पितरांचा मिळतो आशीर्वाद अन् अडथळे होतात दूर

Mumbai Underworld: दाऊद इब्राहिम, छोटा राजन ते मन्या सुर्वे... मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचा लेखाजोखा वाचा

Maharashtra News Live Update: सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती

Election Commision : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! फॉर्म ६ मधून SIR चा भाग हटवला

Farmer Loan Waiver Scheme : दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा

SCROLL FOR NEXT