Shiv Sena UBT Division Chief Pradeep Purnekar Shot Dead Saam TV
मुंबई/पुणे

Pradip Purnekar: मोठी कारवाई! पूर्णेकरांवर गोळ्या झाडणाऱ्या आणखी दोघांना अटक, प्रसिद्ध बिल्डरला चौकशीसाठी बोलावलं

Pradip Purnekar Case Update: शिवसेना नेते प्रदीप पूर्णकर हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन शूटर्सला अटक केली. दोघेही गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली.

Priya More
  • प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन शूटरला अटक

  • निखिल यादव आणि नितेश पवार यांना ठाणे पोलिसांकडून अटक

  • पूर्णेकर हत्या प्रकरणात बिल्डर जितेंद्र मेहता यांची चौकशी

  • प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांकडून शोध

सचिन काटे, ठाणे

शिवसेनेचे ठाण्याचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या २ शूटरला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्या प्रकरणात ठाणे पोलिसांनी आतापर्यंत ३ जणांना अटक केली आहे. आज पहाटे निखिल यादव अणि नितेश पवार या दोघांना अटक करण्यात आली.

ठाणे पोलिसांनी पूर्णेकरांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी पप्या शिंदेला अटक केली होती. तर तिसऱ्या दिवशी दोघांना अटक केली. आज दुपारी त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मागील तीन दिवसांत पोलिसानी तिघांना अटक केली आहे. निखिल यादव अणि नितेश पवार गोवा या ठिकाणी पळ काढत असतानाच त्यांना पोलिसानी अटक केली आहे. या प्रकरणात अजून दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी पोलिसांनी जेव्हीएमचे बिल्डर जितेंद्र मेहता यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. क्राईम ब्रांचने त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी जे व्ही एम बिल्डरविरोधात अनेक आरोप केले आहेत. प्रदीप पूर्णेकर हे जे व्ही एम बिल्डरविरोधात आंदोलन करणार होते. जे व्ही एम बिल्डिंगच्या बाजूला अनधिकृत लोखंडी पार्किंगसंदर्भात ते आंदोलन करणार होते. ही लोखंडी पार्किंग लोकांच्या घरावर पडणार यामुळे ते आंदोलन करणार होते यासंदर्भात त्यांनी पत्र देखील प्रशासनाला दिलं होतं. मात्र आंदोलनापूर्वीच त्यांची हत्या झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये विविध मागण्यांसाठी लोहार समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Mirror Work Dupatta: नवरात्रीत दिसा स्टायलिश आणि ट्रेंडी; मिरर वर्क दुपट्टा सेटचे 'हे' ७ सुंदर डिझाइन्स पाहा

Ration Card Update : मोठी बातमी! ऑक्टोबरपासून 1.58 कोटी रेशन कार्ड होणार तात्पुरते बंद; तुमचं कार्ड तर नाही ना?

PM Narendra Modi : "हनुमान चालीसा म्हटली अन्.." फ्लायदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार पीएम मोदींशी संवाद साधताना झाले भावुक; पाहा Video

Mumbai Politics: मोठी बातमी! मुंबईत मनसेच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT