Thane Crime News Shil Daighar Police Station SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbra Crime News : क्लिनिकपासून २ किमीवर आढळला डॉक्टरचा मृतदेह; मुंब्रातील हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा

Thane Crime : मुंब्रा येथील डॉक्टरांच्या हत्यांकाडाचा काही तासांतच पोलिसांनी उलगडा केला.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Thane Police News :

ठाण्यातील मुंब्रा येथील ६२ वर्षीय डॉक्टरच्या हत्येचा ठाणे पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात ठाणे शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी एका रिक्षाचालकाला अटक केली. पोलीस तपासात डॉक्टरच्या हत्येमागील धक्कादायक कारण उघडकीस आले आहे.

सिराज अहमद खान (वय ६२) असे हत्या झालेल्या डॉक्टरांचं नाव आहे. ते मुंब्रा येथे राहत होते. शिळ डायघर परिसरात ते २० वर्षांपासून प्रॅक्टिस करत होते. त्यांचा एक भाऊ पश्चिम बंगालमध्ये सरकारी नोकरीत आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

शीळ डायघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रिक्षाचालक वाशिम मेमन (वय ४४) याने खान यांच्याकडून पैसे उसने घेतले होते. त्याला रिक्षाचा टॅक्स भरायचा होता. उसने घेतलेल्या पैशांतून त्याने टॅक्स तर भरला नाहीच, शिवाय ते पैसेही खान यांना परत केले नाहीत. खान यांनी मेमनकडे अनेकदा पैशांची मागणी केली. (Crime News)

याच कारणावरून त्यांच्यात वादही झाला होता. त्यानंतर मेमनने खान यांच्या हत्येचा कट रचला. सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास खान यांनी क्लिनिक बंद केला. मेमनने खान यांना रिक्षातून फडकेपाडा परिसरात नेले. तिथे त्यांची दगडाने ठेचून हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

डॉक्टर खान हे घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत होते. त्यांनी शोध सुरू केला. क्लिनिकपासून दोन किलोमीटरवर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. काही स्थानिकांनी याबाबत मुंब्रा पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. खान यांचा मृतदेह नजीकच्या रुग्णालयात नेला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मेमन याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. मेमनला तात्काळ अटक केली. स्थानिक न्यायालयात त्याला हजर करण्यात आले असता, पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar: शुक्र ग्रह स्वतःच्याच राशीत करणार गोचर; 'या' राशींच्या नशीबाचा तारा चमकणार

Rabies Awareness: कोणकोणते प्राणी चावल्याने रेबीज होऊ शकतो?

Tilak Varma : तिलक वर्माचा मास्टरक्लास! सूर्याभाऊही झुकला, षटकार पाहून गंभीरने दिली भन्नाट Reaction; पाहा Video

India Asia Cup 2025 Winner : भारताचा विजय 'तिलक'! पाकिस्तानचे वस्त्रहरण; २१ दिवसांत तिसऱ्यांदा पराभवाची चव चाखवली

BMC Election: मुंबई महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? महायुतीला यश मिळणार की ठाकरे बंधूंचा करिश्मा चालणार?

SCROLL FOR NEXT