Thane Coastal Road Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Coastal Road: घोडबंदरवरील वाहतूक कोंडी फुटणार; खारेगाव ते गायमुख १५ मिनिटात; कोस्टल रोडबाबत मोठी अपडेट

Thane Coastal Road Project Update: ठाणे कोस्टल रोडच्या कामाला वेग आला आहे. कोस्टल रोडचे काम दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. यातील खारेगाव ते गायमुख रोडचे काम सुरु झाले आहे.

Siddhi Hande

ठाणे कोस्टल रोडच्या कामाबाबत अपडेट

ठाणेकरांची वाहतूक कोंडी फुटणार

पहिल्या टप्प्यातील कामाची सुरुवात

ठाण्यातील घोडबंदर परिसरात खूप वाहतूक कोंडी होते. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना कधीकधी तासनतास एकाच ठिकाणी थांबावे लागते. आता या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणाने ठाणे कोस्टल रोडचे काम हाती घेतले आहे. ठाणे कोस्टल रोड पूर्ण झाला की प्रवास सुसाट होणार आहे.

खारेगाव ते गायमुख फक्त १५ मिनिटांत (Kharegaon to Gaimukh In Just 15 Minutes)

ठाण्यातील कोस्टल रोड प्रकल्पातील खारेगाव-गायमुख टप्प्याच्या कामाला वेग आला आहे. पायाभरणीचे काम ५० टक्के काम पूर्ण केले आहे. पिअर कॅप, आय गर्डर उभारणीच्या कामाला वेग आला आहे.

खारेगाव ते गायमुख हा टप्पा १३.४ किमी लांब आहे. हा टप्पा डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यानंतर हा मार्ग प्रवाशांसाठी सेवेत दाखल होणार आहे.हा टप्पा सुरु झाल्यानंतर घोडबंदरची वाहतूक कोंडी फुटणार आहे. खारेगाव ते गायमुख हे अंतर १५ मिनिटांत पार करता येणार आहे.

पहिल्या टप्प्याचे काम सुरु

एमएमआरडीएने ठाण्यातील अनेक प्रोजेक्टचे काम हाती घेतला आहे. घोडबंदरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे सागरी किनारा मार्ग बांधण्यात येणार आहे. दोन टप्प्यांमध्ये हे काम होणार आहे. खारेगाव ते गायमुख आणि दुसरा टप्पा बाळकूम ते आनंदनगर असणार आहे.

ठाणे कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं काम आठ महिन्यांपूर्वी सुरु झालं आहे. आठ महिन्यात पायाभरणीचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. काम खूप वेगात सुरु आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळेत हा मार्ग सुरु केला जाऊ शकतो.

२०२८ पर्यंत होणार सुरु

ठाणे कोस्टल रोड हा ठाणे शहराला गोलाकार बाजूने वेढलेला असणार आहे. आमणे उन्नत रस्ता, कासारवडवली-खारबाव मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात प्रवास खूपच सुकर होणार आहे. खारेगाव गायमुख प्रकल्पाचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी पाऊण तास लागतो. मात्र, या मार्गामुळे हा प्रवास फक्त १५ मिनिटांत होणार आहे. सध्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु आहे. भविष्यात दुसरा टप्पा सुरु झाल्यानंतर ठाणेकरांना फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT