Two Seriously Injured in Thane Attack Saam
मुंबई/पुणे

प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकावर भररस्त्यात हल्ला, आरोपींमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचाही समावेश

Two Seriously Injured in Thane Attack: ठाण्यात हॉटेल व्यावसायिकावर काठीनं हल्ला. वर्षभरापूर्वी झालेल्या वादातून हल्ला झाल्याची माहिती.

Bhagyashree Kamble

  • हॉटेल व्यावसायिकावर ४ ते ५ जणांकडून हल्ला.

  • जून्या वादातून मारहाण.

  • आरोपींवर गु्न्हा दाखल.

पूर्ववैमनस्यातून हॉटेल व्यावसायिकावर टोळक्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातून उघडकीस आली आहे. हॉटेल व्यावसायिकाची गाडी अडवून लाकडी दांडक्यानं मारहाण केली. टोळक्यानं मिळून दोघांवर लाठी-काठीनं हल्ला केला. या प्रकरणी तक्रारीनुसार, वर्तकनगर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील उपशहर प्रमुख देखील असल्याची माहिती आहे.

नेमकं प्रकरण काय?

मलया जगबंधू बारीक (वय वर्ष ३८) असे हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. ते ठाण्यातील वागळे इस्टेट येथील अंबिकानगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. २०२४ साली त्यांचं काही जणांसोबत वाद झाला होता. २६ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हॉटेल व्यावसायिक आणि त्यांचे मेहुणे दोघेही मोटारसायकलवरून जात होते.

टोळक्यांनी आधी त्यांची इंदिरानगर येथे गाडी अडवली. यानंतर आरोपी गणेश लांडगे यानं मलया आणि त्यांच्या मेहुण्यांवर लाकडी दांडक्यानं हल्ला केला. तसेच मारहाण केली. गणेश याच्यासह ४ ते ५ जण उपस्थित होते. या मारहाणीत मलया यांच्या डोक्यावर आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली.

मारहाणीनंतर दोघांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यानंतर हॉटेल व्यावसायिक मलया यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गणेश लांडगे, अमर, ओंकार, अभि पाटील, स्वप्नील आणि इतर ४-५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी स्वप्नील शेडगे हा शिवसेना पक्षाचा उपशहर प्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय लाडक्या बहिणींना मिळणार २५ लाखांचे कर्ज; सरकारची योजना आहे तरी काय?

Green Chilli Fry Recipe : जेवणासोबत तोंडी लावायला ही तिखट मिरची फ्राय एकदा करुनच बघा, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; या तारखेला करणार युतीची घोषणा

Pune : पुण्यातील नामांकित कॉलेज बाहेर रॅगिंग, विद्यार्थ्याला चौघांकडून बेदम मारहाण; थरारक VIDEO समोर

नगरपालिका निवडणुकीत मंत्र्यांचे बालेकिल्ले ढासळले, ११ ठिकाणी भाजपचा दारुण पराभव; कोणत्या नेत्यांना फटका बसला?

SCROLL FOR NEXT