'साहेबांच्या कामाच्या पद्धतीला तोड नाही'; बारामतीत अजित पवारांकडून शरद पवारांचं कौतुक, म्हणाले..

Ajit Pawar Praises Sharad Pawar: बारामतीत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.
Ajit Pawar Praises Sharad Pawar
Ajit Pawar Praises Sharad PawarSaam Tv
Published On
Summary
  • बारामतीत अजित पवारांचं भाषण.

  • अजित पवारांकडून शरद पवारांचं कौतुक.

  • राजकीय वर्तुळात चर्चा.

उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना, अजूनही लोकांच्या मनात एक प्रश्न कायम आहे, 'पवार काका - पुतणे कधी एकत्र येणार?' अद्याप तरी मात्र कुणीही याचे संकेत दिले नाही. पण नुकतेच बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. 'साहेबांच्या कामाच्या पद्धतीला तोड नाही', असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार आपल्या भाषणात शरद पवारांवर बोलताना जपूनच बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र, यामुळे त्यांच्या पदरी अपयश आलं. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार आपल्या भाषणातून शरद पवार यांचे कौतुक करत आहेत. याचा प्रत्येय पुन्हा एकदा बारामतीतीत एका सभेतून आलाय.

Ajit Pawar Praises Sharad Pawar
दांडिया कार्यक्रमात आमदाराचा राडा! स्टेजवर थिरकत असताना तरूणाच्या कानाखाली वाजवली, VIDEO व्हायरल

बारामतीत सहकारी बँकेच्या वार्षिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार सभेत उपस्थित होते. भाषणेदरम्यान, अजित पवार म्हणाले, '१९९१ साली जेव्हा मी आमदार झालो. तेव्हा मला माहित होतं की, माझ्या कामाची तुलना साहेबांच्या कामाशी केली जाईल. शरद पवार यांच्या कामाच्या पद्धतीला तोड नाही', असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar Praises Sharad Pawar
'तटकरेंसारख्या xxx..' महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; शिंदे गटाच्या आमदाराची दादांच्या खासदारावर जहरी टीका

शरद पवार यांच्याबाबतीत बोलताना अजित पवार म्हणाले, 'मी अनेकदा म्हणतो की बारामतीला माझ्यासारखा आमदार कधीच मिळणार नाही. जो सकाळी ६ वाजता काम सुरू करतो. शरद पवार हे खासदार होण्यापूर्वी याच मतदारसंघात आमदार होते'. यानंतर अजित पवारांनी शब्द फिरवला, 'मागच्या आमदारांवर टीका करायची नाही. कारण तुम्ही लगेच म्हणाल की, अजित पवारांनी साहेबांशी तुलना केली. खरं तर त्यांना बाकीचाही व्याप होता. देश अन् राज्याचे राजकारण पाहायचे होते. नंतरच्या काळात बारामतीचा अधिक विकास केला', असं अजितदादा म्हणाले.

Ajit Pawar Praises Sharad Pawar
बीडमध्ये आस्मानी संकट; पुरात पिकांसह २ मुलंही वाहून गेली, आजीबाईंवर ३ नातवंडांची जबाबदारी

पावलोपावली साहेबांशी तुलना होणार

अजित पवार म्हणाले, 'मी ज्यावेळी आमदार झालो. तेव्हा माझे मन सारखे म्हणायचे, पवार साहेबांच्या जागेवर तू नेतृत्व करीत आहेस, तर पावलोपावली पवार साहेबांशी तुलना केली जाईल. साहेबांच्या कामाच्या पद्धतीला तोड नाही', असंही अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com