Metro 5 Saam Tv
मुंबई/पुणे

गुड न्यूज! ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो कधी सुरू होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Metro 5 news : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो बाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या मेट्रोबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Vishal Gangurde

ठाणे ते भिवंडी मेट्रोबाबत महत्वाची माहिती समोर

मेट्रो मार्ग ५ बाबत नवीन डेडलाइन समोर

ठाणे-भिवंडी मेट्रो लाइन-५ काम अंतिम टप्प्यात

ठाणे ते भिवंडी मेट्रोबाबत महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. मेट्रो लाइन ५ कधी सुरू होणार, याबाबत नवीन डेडलाइन जारी करण्यात आली आहे. या मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबर २०२६ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जानेवारी २०२७ मध्ये मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या ठाणे-भिवंडी मेट्रो लाइन-५ काम अंतिम टप्प्यात आहे.

काही दिवसांपूर्वी दहीसर-काशीगांव मेट्रो मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या मार्गावर गर्दी पाहायला मिळाली होती. त्यामुळे ठाणे शहराला मेट्रोची नितांत गरज आहे. सध्या ठाणे ते भिवंडीदरम्यान प्रवास करणाऱ्यांना बसवर अवलंबून राहावे लागते. त्यात सांयकाळी या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असते. ट्रेनने जाणाऱ्या प्रवाशांना दिवा रेल्वे स्टेशनहून मेमू ट्रेनचा आधार घ्यावा लागतो. परंतु या मेमू ट्रेनचा प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी आहे. परंतु मेट्रो -५ मार्ग सुरू झाल्यानंतर वाहतूककोंडीची संख्या कमी होऊ शकते.

मेट्रो मार्ग - ५ २४.९० किलोमीटर लांब आहे. ही मेट्रो ठाणे, भिवंडी-कल्याण भागांना जोडणार आहे. पहिल्या टप्प्यातील ठाणे ते भिवंडी मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पाचं ग्राऊंडवर्क आणि इतर काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. भिवंडी महानगरपालिका, एमएमआरडीए आणि मेट्रो अधिकारी कामावर लक्ष ठेवून आहे. काम हे प्रगतिपथावर आहे. भिवंडीहून ठाणे आणि मुंबईला जाणाऱ्यांना थेट रेल्वे सेवा मिळत नाही. त्यांना ठाणे, मुंबईला जाण्यासाठी एक ते दोन तास प्रवास करावा लागतो. या मार्गामुळे भिवंडीतील हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

ठाण्याहून भिवंडीमार्गे कल्याणपर्यंत तयार होणारी मेट्रो सेवा २४.९० किलोमीटर असणार आहे. या मार्गात एकूण १५ स्टेशन असणार आहे. तसेच काही प्रस्तावित मेट्रो मार्गांना जोडण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ८४१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मेट्रो मार्ग ४ (वडाळा - कासरवडवली) आणि मेट्रो मार्ग १२ बरोबर कनेक्टिविटी मिळणार आहे. हे मेट्रो मार्ग पुढे मध्य रेल्वेशी जोडण्यात येणार आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर अनेकांचा प्रवास सुकर होईल.

मेट्रो मार्गावर कोणते स्टेशन असणार?

बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजुरफाटा, धमणकर नाका, भिवंडी, गोपाळ नगर, तेमघर, राजनौली, गोवे गाव, कोनगाव, लाल चौकी, कल्याण स्टेशन, कल्याण एपीएमसी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT