Thane News  Saam TV
मुंबई/पुणे

Thane Bandh : ठाणे बंदचा नागरिकांना फटका, रिक्षासाठी लांबच लांब रांगा; पोलीस जागोजागी तैनात

Thane News : नौपाड्यातील गोखले रोडवर देखील तुरळक वाहने दिसत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

विनय म्हात्रे

Thane Bandh News :

मराठा आंदोलनकर्त्यांवर जालना येथे झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. ठाणे बंदला जवळपास सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र या बंदचा नागरिकांना फटका बसताना दिसत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.

ठाण्यातील सर्वाच भागात बंदचा परिणाम दिसून येत आहे. ठाण्यातील नेहमी गजबजलेला नौपाडा परिसरातही आज शुकशुकाट दिसत आहे. नौपाड्यातील गोखले रोडवर देखील तुरळक वाहने दिसत आहेत. (Latest Marathi News)

रिक्षासाठी लांब रांगा

कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला ठाणे बंदचा फटका बसताना दिसत आहे. बंदमुळे ठाणे शहरात ऑटोरिक्षा बंद आहेत. ज्या रिक्षा सुरु आहेत त्यासाठी प्रवाशांना तब्बल तास ते दीड तास रांगेत उभं रहावं लागत आहे. (Mumbai News)

ठाणे बंदची हाक दिल्यानंतरही काही दुकाने उघडी होती. ही सर्व दुकाने कार्यकर्त्यांकडून बंद केली जात आहेत. व्यापाऱ्यांना हात जोडून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सहकार्य करण्याची विनंती केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यातील संकल्प दहीहंडी उत्सवाला सुरुवात

High cholesterol: डाएटींग केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं? डॉक्टरांनी सांगितलं नसांना चिकटलेली चरबी कशी कमी कराल, जाणून घ्या

Kalyan Latur Expressway : कल्याणवरून लातूरला पोहचा फक्त ४ तासांत, नवा महामार्ग होतोय तयार; कुठून कसा करता येणार प्रवास?

Shocking: विद्यार्थ्याच्या कपाळावरचा टिळा पुसला, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शिक्षिकेचे तडकाफडकी निलंबन

Shravan Somvar : उपवासाला फक्त ३० मिनिटांत बनवा पारंपरिक फलाहारी थाळी, चवही भारी अन् आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT