Mumbai Crime news Saam Tv
मुंबई/पुणे

नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर रंगेहाथ पकडलं, बायकोचा रौद्रावतार पाहून तरूणाची खाडीत उडी

MUMBAI LATEST CRIME: ठाण्यातील एका रिक्षाचालकाचे विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर संतप्त पत्नीने थेट लॉजवर धाड टाकली. अपमानित झालेल्या पतीनं बुधवारी मध्यरात्री ऐरोली खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Bhagyashree Kamble

  • ठाण्यातील एका रिक्षाचालकाचे विवाहबाह्य संबंध उघड.

  • संतप्त पत्नीने थेट लॉजवर धाड टाकली.

  • पतीनं ऐरोली खाडी पुलावरून उडी मारली.

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाण्यातील एका रिक्षाचालकाचे विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर संतप्त पत्नीने थेट लॉजवर धाड टाकली. या प्रकारानंतर अपमानित झालेल्या पतीनं बुधवारी मध्यरात्री ऐरोली खाडी पुलावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, गुरूवारी सकाळी तो खाडीतील गाळात अडकलेल्या अवस्थेत जिवंत आढळून आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

रिक्षाचालक हा ठाण्यातील रहिवासी आहे. रिक्षाचालक परस्त्रीच्या प्रेमात पडले होते. पत्नीला याची माहिती मिळताच त्यांचा संशय बळावत गेला. त्यांनी पतीवर पाळत ठेवली. पती परस्त्रीसोबत लॉजवर जात असल्याचं समजताच पत्नीनं पतीचा पाठलाग केला. पतीनं या दरम्यान, दोघांना रंगेहाथ पकडलं. संतप्त पत्नीने त्याच ठिकाणी पतीला जाब विचारला.

अपमानित झाल्यानंतर पतीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं ठरवलं. अपमानित झाल्यानंतर रिक्षाचालक थेट मध्यरात्रीच्या सुमारास ऐरोली खाडीवर पोहोचला. तेथून त्यानं पत्नीला फोन केला, चुक झाल्याची कबुली दिली. 'आत्महत्या करतोय' असं सांगत त्यांनं फोन ठेवला. तसेच खाडीतून उडी मारली.

काही वेळातच रिक्षा चालकाच्या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांना याची माहिती दिली. रबाळे पोलीस, ऐरोली पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहिम राबवली. मात्र, रिक्षा चालक काही सापडला नाही. गुरूवारी सकाळी रिक्षाचालक खाडीतील गाळात सापडला. पोलिसांनी त्याला बाहेर काढले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT