Sachin Ahir’s switch to Shinde Sena triggers introspection within Thackeray camp, raising questions over internal unity and future strategy. Saam tv
मुंबई/पुणे

अहिरांच्या बंडानंतर ठाकरेसेनेत आत्मचिंतनाचा सूर, सुनील शिंदेच्या विधानाला राऊतांचा पाठिंबा

Sunil Shinde Reaction On Sachin Ahir Defection: विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानं ठाकरसेनेला आत्मचिंतनाची गरज भासू लागलीये. ठाकरेसेनेत आत्मचिंतनाला वाचा कोणी फोडली? त्याला कोणत्या मोठ्या नेत्यानं समर्थन दिलं? आणि वरळीतला ठाकरेसेनेला दुसरा बुरूजही ढासळणार का? पाहूयात हा रिपोर्ट....

Saam Tv

ठाकरेंचे विश्वासू आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती निवडणुकीचं निमित्त साधत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरेसेनेला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये. मात्र, अहिरांच्या बंडानंतर आता ठाकरेसेनेत आत्मचिंतनाची गरज व्यक्त केली जातेय. आणि या आत्मचिंतनाला वाचा फोडली ती ठाकरेसेनेचे वरळीतलेच विधानपरिषदेचे आमदार सुनील शिंदेंनी...विशेष म्हणजे ठाकरेसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनीही पक्षाला राजकीय भविष्यासाठी आत्मचिंतन आवश्यक असल्याचं म्हटलंय.

मात्र आत्मचिंतनाची भाषा करणारे सुनील शिंदेच नाराज असल्य़ाची चर्चा आहे. त्यामुळे सचिन अहिरांच्या रुपानं वरळीतला पहिला बुरूज ढासळला. आणि आता सुनील शिंदेंच्या रुपात दुसराही बुरूज ढासळणार का? याची चर्चा रंगलीय...मात्र, आपल्याला गळाला लावणं केवळ अशक्य असल्याचं सांगत सुनील शिंदेंनी या चर्चा फेटाळून लावल्यात... मात्र यामुळे ठाकरेसेनेसमोर पक्षसंघटना टिकवून ठेवण्यासाठी काय आव्हान आहेत ते पाहूयात...

पक्षात विश्वास टिकवून ठेवणे आणि नाराजी वाढण्यापूर्वी संवाद साधणे

निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणणे

मोजक्या नेत्यांनाच जबाबदारी न देता स्थानिक नेतृत्वाला संधी देणे

नव्या चेहऱ्यांना संधी देणे आणि जनतेच्या प्रश्नांवर लढा उभा करणे

खासदार फोडल्यानंतर आता आमदार फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू झालंय. आणि त्याची सुरूवात सचिन अहिरांपासून सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी आमदार सोडून जाण्यापूर्वी खरंच आत्मचिंतन करणार का? आत्मचिंतनाची गरज नेतृत्वाला आहे की पहिल्या फळीतल्या नेत्यांना? यावर आता ठाकरेसेना काय रणनीती आखणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : गटारी अमावस्येसाठी कोल्हापूरकरांची मटण- माशांच्या खरेदीसाठी गर्दी

Delhi Pune Flight : दिल्ली - पुणे विमानात भयंकर घडलं! प्रवाशांची घुसमट झाली, घाम फुटला अन्...

Sleeping : पावसाळ्यात रात्री डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपताय? सावधान! शरीरावर होतायेत 'हे' गंभीर परिणाम

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

SCROLL FOR NEXT