Uddhav Thackeray and Aditya Thackeray unveil a women-centric welfare strategy ahead of Mumbai civic elections. saam tv
मुंबई/पुणे

मुंबईतल्या मोलकरणी लाडक्या होणार? महिन्याला १५०० रुपये मिळणार, ठाकरेंची नवी रणनीती काय?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या हिंदूत्ववादी अजेंड्याला मात देण्यासाठी ठाकरेंनी लाडकीचं कार्ड खेळलंय.. ते नेमकं कसं... आणि ठाकरेंच्या वचननाम्यामुळं भाजप आणि शिंदेसेनेचं कसं टेन्शन वाढलंय..

Bharat Mohalkar

विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण महायुतीसाठी गेमचेंजर ठरली... मात्र आता ठाकरेंनीही महायुतीचं आव्हान मोडून काढण्यासाठी तोच फंडा वापरण्याची रणनीती आखलीय..मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये स्वाभिमान निधी म्हणून देण्याची घोषणाच ठाकरेंनी वचननाम्यात केलीय.. त्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढलंय...

एवढंच नाही तर ठाकरेंच्या वचननाम्यात मच्छिमार महिलांसह नोकरदार महिलांनाही साद घातलीय.. नेमकं काय आहे वचननाम्यात..

महिलांसाठी मास्टरस्ट्रोक

घरकामगार महिलांना 1500 रुपयांचा स्वाभिमान निधी देण्यात येणार आहे... तसंच मच्छिमार महिलांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आलीय... याबरोबरच मुंबईत अत्याधुनिक स्वच्छतागृहाचं मोठं जाळं तयार करण्यात येणार आहे.. त्यात प्रत्येक 2 किमीवर महिलांसाठी शौचालयाची बांधण्यात येणार आहेत.. एवढंच नाही तर नॅपकिन व्हेडिंग मशीनची सुविधाही देण्याचं वचन ठाकरेंनी दिलंय..

दुसरीकडे ठाकरेंचा वचननामा नसून वाचननामा होता, असा खोचक टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय... खरंतर लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला... त्यानंतर महायुतीनं लाडकी बहीण योजना सुरु करत महिलांना दीड हजार देण्यास सुरुवात केली आणि हिच योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली... या योजनेमुळे भाजपला 132, शिंदेसेनेला 56 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 42 जागांवर विजय मिळाला...आता हाच फंडा ठाकरेंनी वापरलाय..

त्यातच मराठी, मच्छिमार आणि कोळी समाज हा पारंपरिकरित्या ठाकरेंच्या पाठीशी आहे.. त्यामुळे आता विधानसभेला जसा लाडकीनं महायुतीला कौल दिला...तसाच कौल मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंना मिळणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

'V' Neck ब्लाउजची क्रेझ; साडीला देईल रॉयल लूक, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Father Of Anushka Sharma: कडक शिस्त अन् देशाचे संरक्षक, अभिनेत्री अनुष्का शर्माचे वडील काय काम करायचे ?

Crime: कोचकडून महिला खेळाडूवर बलात्कार, हॉटेलवर सरावासाठी बोलावलं अन्...; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

SCROLL FOR NEXT