Sushma Andhare News  Saam Tv
मुंबई/पुणे

Sushma Andhare News : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना संपविण्याचा घाट घातलाय; सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल सुरूच आहे.

रोहिदास गाडगे

Sushma Andhare News : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल सुरूच आहे. सुषमा अंधारे यांनी जाहीर सभेतून शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र करत गंभीर आरोप केले आहेत. 'एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेना संपविण्याचा घाट घातला आहे. शिवसेना संपवताना शिवसेना भवनावरही त्यांचा डोळा असून शिवसेना भवनावर ते ताबाही घेतील, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला महाप्रबोधन यात्रेच्या कार्यक्रमात सुषमा अंधारे बोलत होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, 'शिवसेनेला फूट नवीन नाही. नारायण राणे, छगन भुजबळ आणि राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. मात्र, त्यांच्या जाण्याने शिवसेना गलितगात्र झाली नाही. यापूर्वी गेलेल्या शिवसेनेच्या मुळावर उठले नव्हते. मात्र, एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत'.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना संपविण्याचा घाट घातला आहे. शिवसेना संपवताना शिवसेना (Shivsena) भवनावरही त्यांचा डोळा आहे. शिंदे हे शिवसेना भवनाचाही ते ताबा घेतील किंवा प्रति शिवसेना भवन उभं करतील, अशी शक्यता भर सभेत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.

'शिवसेना भवन हे जागरुक देवस्थान आहे. त्यामुळे मातोश्री आणि शिवसेना भवनाचे अधिष्ठान हिरावून घेऊ शकत नाही, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला.

'जे हात मातोश्रीवर उठत आहेत. ते हात कलम करण्यासाठी तयार व्हावं लागेल, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी इशारा दिला आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या गंभीर आरोपावर शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर येईल, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Rules: UPI वापरात मोठा बदल! १ ऑगस्टपासून ५ नवे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

SCROLL FOR NEXT