Uddhav Thackeray SAAM TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray On BMC: मोठी बातमी! ठाकरे गट महापालिकेवर काढणार मोर्चा, उद्धव ठाकरे यांची घोषणा

मोठी बातमी! ठाकरे गट महापालिकेवर काढणार मोर्चा, उद्धव ठाकरे यांची घोषणा

Satish Kengar

Uddhav Thackeray On BMC Election: शिवसेना (ठाकरे गट) मुंबई महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात १ जुलै रोजी हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

आज शिवसेना भवनात ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ''महापालिका विसर्जित होऊन एक वर्ष झालं आहे. यानंतर निवडणूक आज होतील, उद्या होतील, पर्वा होतील सुरु आहे. पावसाप्रमाणे निवडणुकाही लांबत चालल्या आहेत.''

ते म्हणाले, ''निवडणूक घेण्याची हिम्मत आताच्या सरकारमध्ये नाही. लोकांची कामे कराची कशी हा प्रश्न पडला आहे. पैसा उधळला जातोय. खर्च केला जातोय, त्याला जाब विचारणारं कोणीच नाही. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे म्हणाले, ''ज्यावेळी महापालिकेत जनतेचे प्रतिनिधी असतात, तेव्हा तिथे प्रशासन प्रस्ताव पाठवत असतं. स्टँडिंग कमिटीमध्ये सर्व पक्षीय सदस्य असतात. त्यांच्या समोर त्याच्यावर चर्चा होते. मंजुरी ना मंजुरी होते, यानंतर हे कंत्राट दिलं जात. सध्या वारेमाप उधळपट्टी सुरु आहे.''

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ''मुंबईला कोणीच मायबाप राहिलेलं नाही. सगळी लुटालूट सुरु आहे. या भ्रष्टाचाराला वाचाफोडत जाब विचारण्यासाठी येत्या १ जुलैला शिवसेना महापालिकेवर विचारात मोर्चा काढणार आहे. या मोर्चाच नेतृत्व शिवसेना नेत्यांसह आदित्य ठाकरे कितील.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Maharashtra News Live Update: पुणे विद्यापीठ कुलसचिवांच्या कार्यालयाच्या बाहेर अभाविप आक्रमक

Kidney Cancer: किडनीत कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी शरीरात दिसतात ही 6 लक्षणं

भाजप महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षांचं निधन, राजकारणात शोककळा, मंत्री, आमदार निवासस्थानी दाखल

ठाण्यातील भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, 'त्या' कारणामुळे पक्षाला केला रामराम; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT