Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Thackeray Group Star Campaigner list : ठाकरे गट प्रचाराचा धुरळा उडवणार; २४ प्रचारकांची यादी जाहीर

Thackeray Group Star Campaigner update : विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट प्रचाराचा धुरळा उडवणार आहे. ठाकरे गटाच्या २४ प्रचारकांची यादी समोर आली आहे.

Vishal Gangurde

गिरीश कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निडवणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. अनेक राजकीय नेते विरोधकांना अडचणीस आणण्यासाठी डाव आखत असल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गाठीभेटी करण्यास सुरुवात केली आहे. तर काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचारास सुरुवात केली आहे. विधानसभेसाठी आता सर्वच राजकीय पक्षांच्या तोफा मैदानात धडाडणार आहेत. याच निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी समोर आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. ठाकरे गटाने ९० हून अधिक जणांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता ठाकरे गट उमेदवारांचा प्रचार करण्यास सज्ज झाला आहे. ठाकरे गटातील दिग्गज नेते त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत दिग्गज नेत्यांसहित कलाकारांचाही समावेश आहे. ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत २४ जणांचा समावेश आहे. या यादीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचा नावाचा समावेश आहे. तसेच स्टार प्रचारकांच्या यादीत युवसेनेच्या कार्यकारिणी सदस्यांचा देखील समावेश आहे.

ठाकरेंच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

01. उद्धव ठाकरे

02. आदित्य ठाकरे

03. संजय राऊत

04. अरविंद सावंत

05. भास्कर जाधव

06. अनिल देसाई

07. विनायक राऊत

08. आदेश बांदेकर

09. अंबादास दानवे

10. नितीन बानुगडे पाटील

11. प्रियांका चतुर्वेदी

12. सचिन अहिर

13. सुषमा अंधारे

14. संजय (बंडू) जाधव

15. किशोरी पेडणेकर

16. ज्योती ठाकरे

17. संजना घाडी

18. जान्हवी सावंत

19. शरद कोळी

20. ओमराज निंबाळकर

21. आनंद दुबे

22. किरण माने

23. प्रियांका जोशी

24. लक्ष्मण वडले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhinav Arora : अभिनव अरोरा किती आहे कृष्ण भक्त? झालं लाईव्ह टेस्ट, उत्तर ऐकून चकीत व्हाल

Alibaug News: रस्त्यावर पडला पैशांचा पाऊस; मालक कोण? ऐन निवडणुकीत अलिबागमध्ये घडलेल्या प्रकाराने खळबळ

India-China Disengagement : सीमेवरचं टेन्शन मिटलं, चीनचं सैन्य मागे हटलं; शेजारी देश पुन्हा गस्त घालणार

Pune Firing : ऐन दिवाळीत पुण्यात तिघांकडून गोळीबार; तर नवी मुंबईतील उलव्यात स्फोटांचे आवाज, परिसरात खळबळ

Anil Kapoor: अनिल कपूर होणार 'सुभेदार'; OTT वर दिसणार अ‍ॅक्शन अवतार, ढासू लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT