Sanjay Raut
Sanjay Raut  Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut On Amit Shah: 'आमच्या सभेचा जोश पाहायला केंद्रीय गृहमंत्री येणार असतील तर...', संजय राऊत यांचा अमित शाह यांना टोला

Priya More

Mumbai News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. 'अमित शहा हे उद्याच्या आमच्या सभेची तयारी पाहायला आले आहेत. आमच्या नागपूरच्या सभेच्या वेळी देखील ते महाराष्ट्रात आले होते. आमच्या सभेची तयारी, सभेचा आवाका आणि जोश पाहण्यासाठी देशाचे गृहमंत्री आले असतील तर त्यांचे स्वागत आहे.', असा टोला त्यांनी लगावला आहे. यावेळी संजय राऊत यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन देखील सरकारवर (Maharashtra Government) जोरदार टीका केली आहे. मुंबईत पत्रकारांनी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.

वज्रमूठ सभेची तयारी पूर्ण -

उद्या मुंबईमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेबद्दल संजय राऊत यांनी सांगितले की, जन माणसाचा निकाल कोणाच्या बाजूने आहे हे उद्या महाराष्ट्राची राजधानी ठरवेल. या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. कोणतेही अडथळे या सभेत येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहतील.' तसंच उद्याची सभा ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

शिवसेना धमक्यांना भीक घालत नाही -

बारसू रिफायनरी प्रकल्पावर बोलताना संजय राऊत यांनी असे सांगितले की,'बारसूमध्ये अजूनही अत्याचार सुरु आहे. पोलिसांच्या कारवाया सुरु आहेत. शेतकरी, महिला आणि तरुणांवर जोरजबरदस्ती केली जात आहे. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. कोणासाठी या धमक्या दिल्या जात आहे. उद्धव ठाकरेंना कोकणात पाय ठेवून दिला जाणार नाही ही सुद्धा धमकी आहे. अशा धमक्यांना शिवसेना भीक घालत नाही.' तसंच, 'उद्धव ठाकरे यापूर्वी अनेकदा कोकणात गेलेले आहेत. जात असतात आणि यावेळी ही जाणार आहेत. हिंमत असेल तर रोखून दाखवा.', असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

कोकण कुणाच्याही मालकीचे नाही -

'आम्ही 100 वेळा कोणकणात येतो. कोकण हे कुणाच्या मालकीचे नाही. कोकण हे शिवसेनेची एनर्जी पावर सेंटर आहे. या कोकणाने शिवसेनेला ताकद दिली आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी हा संपूर्ण कोकणपट्टा मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आणि शिवसेनेच्या अस्मितेचा पट्टा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बारसुत जातील. लोकांची इच्छा आहे त्यांनी यावे आणि ते जातील. कोकणात कोणाचे पाय घट्ट आहेत आणि कोणाचे पाय लटपटत आहेत हे आधीही जनतेने दाखवले आणि यापुढेही दाखवत राहणार.' असं देखील संजय राऊत यांनी सांगितले.

कर्नाटक विधानसभा निवडणूक -

कर्नाटक विधानसभा निवडणुकीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, 'आम्ही स्वतः बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला जाणार आहोत. महाराष्ट्रातून खास करून शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सगळेच बेळगावात जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांना कारावास झाला होता तो सीमा प्रश्न यासाठी होता. माझं मुख्यमंत्र्यांना आाहन आहे की त्यांनी बेळगावला महाराष्ट्र केसरी समितीला पाठिंबा द्यायलाच जावं. जर तुम्ही खरोखर आंदोलनात सहभागी झाला असाल तर आता जाऊन दाखवा. बेळगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा वारंवार उतरवला जातो यासंदर्भात त्यांनी जाऊन भूमिका मांडावी.' असं देखील त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

SCROLL FOR NEXT