Thackeray Group On Devendra Fadnavis's Resign Saam Tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation: 'फडणवीस यांनी राजीनामा द्यावा', ठाकरे गटाने राज्यपालांची भेट घेऊन दिलं निवेदन

'फडणवीस यांनी राजीनामा द्यावा', ठाकरे गटाने राज्यपालांची भेट घेऊन दिलं निवेदन

Satish Kengar

>> गिरीश कांबळे

Thackeray Group On Devendra Fadnavis's Resign:

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला याविषयी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि मराठा समाजाला आरसक्षण मिळावं, म्हणून निवेदन दिलं. यावेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह आमदार अजय चौधरी, सचिन अहिर, सुनील प्रभू आणि इतर नेते उपस्थित होते.

राज्यपाल याना निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, ''जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ला प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. लाठी चार्ज करण्याचे आदेश कोणी दिले. पोलीस अधिकारी जर त्यात दोषी असतील तर कारवाई करा.'' फडणवीस यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले आहेत की, ''देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे माफी मागितली. माफी मागून चालणार नाही, फडणवीस यांनी राजीनामा द्यावा.'' (Latest Marathi News)

याचबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, लाठीचार्ज झाल्यानंतर उद्धव ठाकरे तिथे पोहोचले. शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यायचा म्हणून लाठीचार्ज करण्यात आला. परिस्थिती बिघडू नये यासाठी आदेश घेतले जातात. ते सांगतात की, आम्ही आदेश दिले नाहीत. मग प्रशासन चालतं कसं?

ते म्हणाले की, ''सरकार कसं चालतं हे राज्यपालांनी त्यांना शिकवावं. समिती नेमतील, एखादा अधिकाऱ्याला निलंबित करतील. लाज असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.'' जालना घटनेचा खरा जनरल डायर कोण? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coronavirus: कोरोनाच्या विषाणूने कॅन्सरवर होणार उपचार, नवीन संशोधनाने डॉक्टरही हैराण

Maharashtra Election: मतदार यादीत नाव कसं शोधायचं?वोटर आयडी नसल्यास काय करावे?हे ७ मुद्दे तुम्ही वाचायलाच हवे

Tmkoc Show: जेठालालचं भांडण पेटलं, निर्मात्याची पकडली कॉलर नंतर दिली शो सोडण्याची धमकी

BJP-Congress Rada : काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, जोरदार हाणामारी अन् खुर्च्या फेकल्या

IPL 2025 Mega Auction: कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? कोण किती खेळाडू विकत घेऊ शकतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT