Business Ideas: फक्त 15 हजार रुपये गुंतवून सुरु करा 'हा' व्यवसाय, लाखो रुपयांची होईल कमाई

How To Start Basil Farming: फक्त 15 हजार रुपये गुंतवून सुरु करा 'हा' व्यवसाय, लाखो रुपयांची होईल कमाई
How To Start Basil Farming
How To Start Basil Farmingsaam tv
Published On

How To Start Basil Farming:

जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल. तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एका सुपरहिट व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च लागणार नाही. तसेच हा व्यवसाय सुरु केल्यावर तुम्ही याद्वारे चांगली कमाई करू शकता.

हा व्यवसाय 'तुळशी'चा आहे. भारतात तुळशीपासून बनवलेल्या पदार्थांना मोठी मागणी आहे. याच कारणामुळे देशातील अनेक व्यापारी तुळशीच्या व्यवसायातून जबरदस्त कमाई करत आहेत. विशेष म्हणजे तुळशीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारही मदत करत आहे. या व्यवसायात तुळशीची लागवड करावी लागते. याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

How To Start Basil Farming
Police Custody: ताब्यात घेतल्यानंतर पोलीस मारहाण करू शकतात का? काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या

तुळशीच्या फार्मिंगचा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही. तुम्ही फक्त 15 हजार रुपयांच्या गुंतवणुकीने हा व्यवसाय सुरू करू शकता.  (Latest Marathi News)

तुळशीच्या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी या वनस्पतींचा वापर केला जातो. तुळशीच्या वनस्पतींचे अनेक प्रकार आहेत. जर तुम्ही एक हेक्टर जमिनीत तुळशीची लागवड केली तर तुम्हाला सुमारे 15,000 रुपये खर्च येतो.

How To Start Basil Farming
Public Provident Fund scheme: सरकारी योजना PPF मध्ये गुंतवणूक केल्यास मिळत आहेत सर्वाधिक परतावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

तुळशीची रोपे तयार झाल्यानंतर त्यांची लागवड केली जाते. लागवडीनंतर 100 दिवसांनी तुळशीची रोपे पूर्णपणे तयार होतात. बाजारात तुळशीच्या बिया आणि तेलाला मोठी मागणी आहे. (Utility News)

हे एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे अनेक कंपन्या तुळशीची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. अशा परिस्थितीत तुम्हीही हा व्यवसाय सुरू केलात तर याद्वारे तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com