नागपूरमध्ये ८ सप्टेंबरच्या मध्यरात्री एका ऑडी कारचालकाने ३ वाहनांना उडवलं. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदविला आहे. काल पोलिसांनी दोन जणांना ताब्यात देखील घेतलंय. या प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचं देखील नाव समोर येतंय. संकेत बावनकुळे यांच्या नावावर ही गाडी असल्याचं समोर येतंय. यामुळे आता विरोधकांनी चंद्रशेखऱ बावनकुळे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेरलंय.
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Nagpur Hit And Run) यांनी नागपूर हिट अॅंड प्रकरणावरून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केलाय. जर या अपघाताशी बावनकुळे कुटुंबाचा काहीही संबंध नाही, तर प्रकरण लपवता का अशी विचारणा त्यांनी केलीय. तर सुषमा अंधारे यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये गाडीचा नंबर का लिहिलेला नव्हता, असा सवाल केलाय?
नागपूर हिट अँड रन प्रकरणातील ऑडी कार ही चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याची होती. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑडी कार माझ्या मुलाची होती, अशी कबुली दिलीय. चौकशी निष्पक्ष व्हावी, असं जर बावनकुळे यांना वाटत होतं तर एफआयआरमध्ये गाडीचा नंबर का आला नाही? ज्या गाडीनं अपघात झालाय, त्याची कागदपत्रे पोलीस स्टेशनला का जमा झाली नाहीत? (Sushma Andhare) एफआयआरमध्ये संकेत बावनकुळे याचं नाव का आलं नाही?
कोणतीही चौकशी न करता आरटीओने गाडी लगेच रिपेअरिंगसाठी का पाठवली? आरटीओ आणि पोलीस प्रशासनावर कोणाचा दबाव होता? तपास अधिकाऱ्यांवर दबाव येणार नाही, याची हमी बावनकुळे तुम्ही कधी देता? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणावरून गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, राज्यातल्या कायदा आणि व्यवस्थेचा कचरा झालाय. राज्यामध्ये दोन कायदे आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. एका बाजूला नरेंद्र मोदी समान कायद्याचा उल्लेख करतात. दुर्दैवाने विरोधी पक्षातील मुलगा असता तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या फौजा तुटून पडल्या असत्या, अशी घणाघाती टीका राऊतांनी केलीय.
अपघातामध्ये चार जखमी तर दोन गंभीर जखमी आहेत. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचं देखील राऊतांनी म्हटलंय. अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसायला सांगितलं आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं, असा गंभीर आरोप राऊत यांनी केलाय. फडणवीस ही व्यक्ती राज्याच्या गृहमंत्री पदाला लायक नसल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.