Vasai News  Saam TV
मुंबई/पुणे

Thackeray Camp VS MNS in Vasai: ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्याला मनसे कार्यकर्त्यांकडून ऑफिसमध्ये घुसून मारहाण, १४ जणांविरोधात गुन्हे दाखल

Thackeray Camp VS MNS in Vasai: अविनाश जाधव यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे हा हल्ला केल्याचे मनसैनिकांनी सांगितले.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Political News : शिवसेना ठाकरे गटाचे वसईतील स्थानिक नेते अनिल चव्हाण यांच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यानी हल्ला करून त्यांना मारहाण केली आहे. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात १४ मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनेसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे हा हल्ला केल्याचे मनसैनिकांनी सांगितले. (Vasai News)

शिवेसना ठाकरे गटातर्फे शुक्रवारी वालीवच्या प्रभाग समिती ‘जी’ च्या कार्यालयावर पाणी टंचाईविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. मात्र अधिकाऱ्यांनी मोर्च्याच्या शिष्टमंडळाला वेळ दिला नाही. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ॲड. अनिल चव्हाण यांनी मनसे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना भेटायला वेळ असतो असे म्हणत अपशब्द काढले.

यामुळे संतापलेल्या मनसेचे स्थानिक पदाधिकारी प्रवीण भोईर, पंकज सावंत आदींसह १४ जणांनी रविवारी संध्याकाळी चव्हाण यांच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाण केली. यावेळी चव्हाण यांच्या कार्यालयातील साहित्याची नासधूस करण्यात आली.  (Latest News Update)

याप्रकरणी ॲड चव्हाण यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मनसेचे प्रवीण भोईर, पंकज सावंत, अमित पाटील, रवी पाटेकर यांच्यासह १० अनोळखी जणांविरोधात मारहाण केल्याप्रकरणी विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हल्ल्याप्रकरणी सोमवारी संध्याकाळपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Shocking : ऑनलाइन डेटा चोरी, महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडीओ व्हायरल; कंपनीवर खटला दाखल

Shani Shingnapur : अभिषेक आता फक्त १०० रूपयांत येणार; शनिशंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय, VIDEO

IPS अंजना कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या सरकारी अधिकाऱ्याला मारहाण; माढ्यातील कुर्डू गावात गुंडगिरी| Video

SCROLL FOR NEXT