IPS Officers Transfer News : गृह विभागात मोठे फेरबदल; राज्यातील 32 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा लिस्ट

IPS Officers Transfer News : संजय दराडे यांच्यावर पुणे विभागच्या विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषणची जबाबदारी देण्यात आली आहे.
mantralay
mantralaysaam tv

IPS Officers Transfer News : राज्यातील गृह विभागात आज मोठे फेरबदल करण्यात झाले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागात 32 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सदानंद दाते यांची दहशतवाद विरोधी पथकाचा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर संजय दराडे यांच्यावर पुणे विभागच्या विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषणची जबाबदारी देण्यात आली आहे.

अनिल कुंभारे यांच्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथकाची जबाबदारी असणार आहे. दिलीप सावंत यांच्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. ज्ञानेश्वर चव्हाण यांची विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिषद बदली करण्यात आली आहे. (Latest News Update)

mantralay
Beed News: उद्धव ठाकरेंच्या दिर्घायुष्यासाठी पायी बालाजीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू, CM एकनाथ शिंदेंकडून कुटुंबियांना मदतीचा हात

एस एन पुरे यांच्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्ह्यांविषयी विभाग पुणे येथील जबाबदारी असणार आहे. डॉ. मनोज लोहिया यांची छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव उगले यांची अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, ठाणे विभाग येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. अभिनव देशमुख यांच्यावर दक्षिण मुंबई अप्पर पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अनिल पारस्कर यांची अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग पदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest News Update)

mantralay
Kalyan News : बिल्डिंग 3 मजल्याची अन् नोटीस चौथ्या पाचव्या मजल्याला नोटीस, मालकही चक्रावले; KDMCचा अजब कारभार

एम रामकुमार यांची अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक विभाग पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शशीकुमार मीना यांची अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे विभाग मुंबई पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण पाटील यांची अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे पदी नियुक्ती झाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com