Thackeray Group BMC Morcha: ''मला विचारण्यात आलं होतं, तुम्ही निवेदन कोणाला देणार. मी म्हटलं चोरांना काय निवेदन द्यायचं. आज सांगून ठेवतोय, जी चोरी तुम्ही केली आहे, ती आमच्या नजरतेत आली आहे. तुमच्या फाईल्स बनवल्या आहेत'', असं ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
आज भ्रष्टाचाराच्या विरोधात ठाकरे गटाने मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढला आहे. यातच कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे असं म्हणाले आहेत. शिंदे आणि फडणवीस सरकारला इशारा देत ते म्हणाले आहेत की, ''ज्या दिवशी आमचं सरकार येईल, त्यावेळी आम्ही आणि पोलीस आत येणार. तुम्हाला तुमची जागा दाखवणार.''
'दिल्लीचे कितीही आदेश आले तरी मुंबई लुटू नका'
सरकारवर हल्लाबोल करताना आदित्य ठाकरे म्हणले की, ''पुढची फाईल सही करताना लक्षात ठेवा तुम्ही काय करत आहेत. या मुंबईला लुटू नका. ही मुंबई आमची आहे, आम्हाला लुटू नका. दिल्लीचे कितीही आदेश आले तरी लुटू नका.''
आदित्य ठाकरे म्हणाले, ''रस्ता घोटाळा करताना त्यांनी आधी असं दाखवलं, आम्ही मुंबईतील सगळ्या रस्त्यांचं काँक्रीटीकरण करणार. सगळे रस्ते खड्डे मुक्त करणार.'' ते म्हणाले, ''इतके वर्ष आम्ही काम करतोय, आम्हाला माहित आहे मुंबई कशी चालते. मुंबईत किती रस्ते तुम्ही खड्डे मुक्त करू शकता. मुंबईत किती रस्ते तुम्ही रिपेअर करू शकता किंवा मुंबईत किती नवीन चांगले रस्ते करू शकता.'' (Latest Marathi News)
आदित्य ठाकरे म्हणाले, ''आपण ज्या रस्त्यावर उभे आहोत, या प्रत्येक रस्त्याच्या खालच्या ४२ वेगवेगळ्या प्रकारच्या युटिलिटी आहेत. एमटीएनएल पासून महानगर गॅसपर्यंत या सगळ्या युटिलिटी या मुंबईत आपल्या रस्त्या खाली असतात. जेव्हा तुम्ही एखादा रस्ता खोदायला किंवा नवीन काम करायला घेतला, तेव्हा १६ नाही ४२ लोकांना कळवायला लागतं की, इथे आम्ही काम करत आहोत.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.