France Violence Explainer: कोण होता 'नाहेल', ज्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशात दंगली उसळल्या

कोण होता 'नाहेल', ज्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशात दंगली उसळल्या
France Violence Explainer
France Violence ExplainerSaam Tv
Published On

France Violence Explainer: फ्रान्समध्ये सध्या मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्याचं पाहायला मिळत आहे. लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले असून ते तेथील सरकार आणि फान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरुद्ध निदर्शने करत आहेत. या दंगली उसळण्याचं कारण म्हणजे १७ वर्षांचा मुलगा नाहेल.

मंगळवारी पोलिसांच्या गोळ्यांनी नाहेलचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर देशातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप पाहायला मिळत आहे. त्याच्या मृत्यूच्या चार दिवसांनंतरही देशात जाळपोळीच्या घटना घडताना दिसत आहेत.

France Violence Explainer
Sharad Pawar on Devendra Fadnavis: माझी गुगली कळलीच नाही, ती गोलंदाजालाच माहिती असते; फडणवीसांना उद्देशून शरद पवारांचं वक्तव्य

पॅरिसमध्ये सलग तिसऱ्या दिवशी लोकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. आंदोलकांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको केला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे १००० लोकांना अटक करण्यात आली आहे. हाणामारीच्या घटनांमध्ये २०० पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

कोण होता नाहेल?

नाहेल हा त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता. रग्बी संघाचा खेळाडू असण्यासोबतच त्याने टेकआउट डिलिव्हरी ऑपरेटर म्हणूनही काम केले. त्याला इलेक्ट्रिशियन म्हणून करिअर करायचे होते आणि त्याला सुरेसनेसच्या कॉलेजमध्ये प्रवेशही मिळाला होता. तो त्याची आई सोबत राहत होता. त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता.

France Violence Explainer
Samruddhi Mahamarg Accident Special Report: समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय का? वाचा स्पेशल रिपोर्ट

पोलिसांनी नाहेलला गोळ्या का घातल्या?

या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये वाहतूक नियम मोडल्यामुळे एका पोलिसाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, असं दिसत आहे. याबाबत बोलताना पोलिसानी सांगितले की, या मुलाने गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com