22 ऑक्टोबरपासून थिएटर्स सुरु होणार... (पहा Video) Saam TV
मुंबई/पुणे

22 ऑक्टोबरपासून थिएटर्स सुरु होणार... (पहा Video)

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरनंतर आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. तर आरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर परवानगी दिली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

व्हिडीओ-

तसेच, आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली. या बैठकीला बॉलिवूड क्षेत्रातील दिग्दर्शक रोहित शेट्टी सुद्धा उपस्थित होते.

राज्यातल्या शाळा ४ आॅक्टोबरपासून सुरु होणार;

दरम्यान, कालच गेल्या वर्षी पासून कोरोना Corona महामारीमुळे मार्च महिन्यात बंद झालेल्या राज्यातल्या शाळा Schools येत्या चार आॅक्टोबरपासून पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचं सरकार कडून सांगण्यात आलं.

शिक्षण विभागाने राज्यातल्या शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे chief minister प्रस्ताव पाठवला होता. गेले काही महिने राज्यातल्या शाळा सुरु करण्याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरु होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करायला परवानगी दिली नव्हती. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे बोलले जाऊ लागल्यावर पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव लांबणीवर पडला होता.

७ ऑक्टोबर पासून राज्यातील मंदिरे उघडणार;

तसेच, काल ता. २४ सप्टेंबरला राज्यभरातील मंदिरे उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच ७ ऑक्टोबर राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे भाविक-भक्तांसाठी आनंदाची वार्ता समोर आली. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच ७ ऑक्टोबर राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. सोबतच कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले आहे.

Edited By-Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT