परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी मी घेतलेली मेहनत फडणवीस यांना माहीत : टोपे
परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी मी घेतलेली मेहनत फडणवीस यांना माहीत : टोपे SaamTvNews

#परीक्षांचाधंदाथांबवा : परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी मी घेतलेली मेहनत फडणवीस यांना माहीत

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं उत्तर...

जालना : राज्याच्या आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी २५ सप्टेंबर २०२१ रोजी आणि गट ड संवर्गातील पदासाठी २६ सप्टेंबर २०२१ रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार होती. परंतु काल रात्री अचानकपणे आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली अन राज्यभरात एकच गदारोळ माजला.

हे देखील पहा :

आरोग्यमंत्र्यांच्या या तडकाफडकी निर्णयाचे पडसाद साहजिकच अपेक्षेप्रामाणे काल रात्रीपासून राज्यभरात उमटू लागले आहेत. आज दिवसभर परिक्षार्थींमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांसह विरोधी पक्षांनी देखील टोपे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या परीक्षेमध्ये दलाल शिरले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केलीय.

परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी मी घेतलेली मेहनत फडणवीस यांना माहीत : टोपे
UPSC Result : महाराष्ट्रातील 100 हून अधिक उमेदवार यशस्वी!

तर, फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना, या परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी मी किती प्रयत्न केलेत आणि किती मेहनत घेतली हे फडणवीस यांना माहीत आहे. मात्र, प्रत्येक परीक्षेत काही प्रवृत्त्या असे वाईट काम करत असतात असं टोपे यांनी म्हटलंय. मात्र, येणाऱ्या ८-१० दिवसांत पारदर्शक परीक्षा घेतल्या जाणार असून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन एकत्रितपणे घेण्यात आल्याचे टोपे म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com