TET scam: टीईटी गैरव्यवहार प्रकरण! बिहारमधून पेपर फोडण्याचे प्रशिक्षण  Saam TV News
मुंबई/पुणे

TET scam: टीईटी गैरव्यवहार प्रकरण! बिहारमधून पेपर फोडण्याचे प्रशिक्षण

सायबर पोलिसांच्या तपासात उघड

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: ऑनलाईन पेपर कसे फोडावे. या बाबत बिहारमधील (Bihar) पाटणा (Patna) येथे प्रशिक्षण घेतले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. टीईटी (TET) गैरव्यवहार प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. या पेपरफुटी प्रकरणात विविध ठिकाणच्या एजंटची (agent) साखळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या (Private company) काही तास अगोदर प्रश्नपत्रिका सर्व्हरवर डाऊनलोड (Download) करतात. (TET scam Case Paper breaking training from Bihar)

हे देखील पहा-

गैरप्रकार करणारे सर्व्हरच्या गोपनीय क्रमांकात म्हणजेच प्रोगामिंग कोडमध्ये छेडछाड करून प्रश्नपत्रिका (Question paper) फोडत होते. परीक्षा घेणारी कंपनी तसेच परीक्षा केंद्रातील काहीजणांशी संगनमत करून ठराविक क्रमांकाच्या उत्तरपत्रिकेतील उत्तर थेट ऑनलाईन (Online) बदली जातात, असे पोलिसांच्या (police) तपासात आढळून आले आहे. त्यासंबंधी एक सविस्तर अहवाल सायबर पोलिसांनी (Cyber ​​police) तयार केला आहे. त्यातून पुणे पोलिसांनी काही निष्कर्ष काढले आहेत.

या प्रकरणात हरकळ बंधूंना उमेदवार व पैसे मिळवून देणार्‍या एजंटच्या अटकेचे सत्र सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत खासगी एजंट, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, परीक्षेचे कंत्राट दिलेल्या खासगी कंपनीचे पदाधिकारी ते थेट प्रशासकीय सेवेतील आयएस अधिकार्‍याला अटक (Arrested) करण्यात आली आहे. टीईटी 2019-20 मध्ये 7 हजार 880 उमेदवार अपात्र असताना पात्र केल्याचे आढळून आले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

SCROLL FOR NEXT