बंगळुरुतील एकाला अटक Saam Tv
मुंबई/पुणे

पेपरफुटी प्रकरणी बडे मासे गळाला, बंगळुरुतील एकाला अटक

औरंगाबाद बोर्डाचा माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक केली आहे. तर दुसरीकडे बंगळुरुमध्येही पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने एकाला गजाआड केलंय.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : टीईटी पेपरफुटी प्रकरणात बडे मासे गळाला लागण्याचं सत्र सुरुच आहे. एकीकडे औरंगाबाद बोर्डाचा माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक केली आहे. तर दुसरीकडे बंगळुरुमध्येही पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने एकाला गजाआड केलंय. - TET Exam Scam Pune Police Arrest One From Bangalore

परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या GA सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीच्या संचालकाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अश्विनकुमार असं या आरोपीचं नाव आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजता पुणे पोलीस पत्रकार परिषद घेऊन या दोघांच्याही भूमिकेविषयी खुलासा करणार आहेत.

हेही वाचा -

दिवसेंदिवस पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना बडे अधिकारी गळाला लागत आहेत. परीक्षा परिषदेचा अटकेत असलेला निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याच्या चौकशीतून डेरे याचे नाव समोर आल्याचं समजतंय. तर प्रितेश देशमुखच्या चौकशीतून अश्विनकुमारपर्यंत पुणे पोलिसांना पोहोचता आलंय.

परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरेंना अटक

परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैर मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक केली आहे. डेरेच्या या अटकेने खळबळ उडाली आहे.

आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या 6 वर पोहचली आहे. प्रकरणाची पाळेमुळे खोलवर जाण्याचे संकेत पोलिसांनी दिले होते, त्यानुसार डेरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी माहिती हाती लागल्यानंतर प्रकरणाची व्याप्ती उघडकीस येण्यास मदत होणार आहे. दरम्यान याआधी डेरे यांच्या कारकीर्द वादग्रस्त, नियमबाह्य नियुक्त्यामुळे त्यांना 2016 मध्ये निलंबित करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमोल कोल्हे आणि जयंत पाटील पवारांच्या भेटीला, आज पुन्हा सिल्वर ओकवर खलबतं

Cancer Screening: वयाच्या ३० व्या वर्षानंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाने 'ही' महत्त्वाची टेस्ट केलीच पाहिजे; अन्यथा...

ऐन दिवाळीत राजकीय धमाका! निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का; दोन बडे नेते पक्षाला ठोकणार रामराम!

APMC Market Rates : राजापुरी सेलम हळदीला सोन्याचा भाव! दिवाळी पाडव्याला मिळाला तब्बल ६५ हजारांचा विक्रमी दर

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये माजी सरपंचाची गुंडगिरी! हॉटेलमध्ये घुसून मालकासह कामगारांना बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT