पेपर फुटी रॅकेटचा गाॅडफादर शाेधण्यासाठी CBI चौकशी करा : पाटील

ही मागणी आम्ही राज्यपालांच्याकडे केली आहे असे विक्रांत पाटील यांनी नमूद केले.
vikrant patil
vikrant patil
Published On: 

सांगली (sangli) : महाराष्ट्र राज्य आयाेग (mpsc) आणि म्हाडाच्या (mahada_ पेपर फुटीचे कनेक्शन मंत्रालयापर्यंत (mantralya) आहे. या रॅकेटचा गॉडफादर वेगळाच आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सीबीआय (cbi) मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजप (bjp) युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील (vikrant patil) यांनी इस्लामपूर (islampur) येथे केली. पाटील यांनी आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर महाविकास आघाडीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

पाटील म्हणाले हे महाविकास आघाडी सरकाराने विद्यार्थी व युवा वर्गाचे वाटोळे केले. स्वत:ची तुंबडी भरण्याचेच काम सरकार आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचे सुरु आहे. त्यामुळे युवा वर्गाचे प्रश्न घेवून आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आहे.

vikrant patil
काेराेनाने मृत झालेल्या वारसांना ५० हजारांची मदत; इथं करा अर्ज

एमपीएससी आणि म्हाडा पेपर फुटीच्या रॅकेटचा गॉडफादर वेगळाच आहे. सरकारला त्यांचा शाेध घेण्यात रस नाही. या सर्व प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे. ही मागणी आम्ही राज्यपालांच्याकडे केली आहे असे विक्रांत पाटील यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.